महाराष्ट्र

गर्भवतीची रुग्णालयाबाहेरच प्रसूती; एक बाळ दगावले, दुसरे सुखरूप

कळवा रुग्णालयाचा निष्काळजीपणा ठाणे : ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे एका गर्भवतीची कळवा रुग्णालयाच्या बाहेरच प्रसूती झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी ९ दरम्यान घडली आहे. या घटनेत एका नवजात बालकाचा मृत्यू झाला आहे तर दुसरा सुखरूप असल्याचे कळते. कळवा पूर्व येथील आतकोनेश्वर नगर परिसरात राहणाऱ्या गरोदर महिलेने आपले नाव छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नोंदवले होते. याच रुग्णालयात तिच्या नियमित तपासण्या सुरु होत्या. तिच्या पोटात दुखू लागल्याने ती मंगळवारी पहाटे ४ च्या दरम्यान कळवा रुग्णालयात आली. मात्र तिला रुग्णालयात दाखल करून न घेता पुन्हा घरी पाठवण्यात आले. प्रसूतीची वेळ अद्याप आली नसल्याचे कारण देत तिला घरी पाठवण्यात आले. मात्र घरी गेल्यानंतर काही वेळा पुन्हा पोटात दुखू लागले. त्यामुळे तिला पुन्हा रुग्णालयात आणले. रुग्णालयात येईपर्यंत उशीर झाल्याने या महिलेची रुग्णालयाच्या बाहेरच प्रसूती झाली. यामध्ये गाडीतच एक मूल बाहेर आले. त्यानंतर तातडीने या महिलेला लेबर वॉर्डला नेण्यात आले. त्यामुळे दुसऱ्या मुलाला या महिलेने रुग्णालयात जन्म दिला. मात्र दुर्दैवाने गाडीत प्रसूती झालेल्या बालकाला डॉक्टरांनी मृत घोषित केले तर दुसरे बालक व्यवस्थित असल्याची माहिती रुग्णालय व्यवस्थापनाच्या वतीने देण्यात आली आहे. ठाणे महापालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय नवजात बालकांसाठी मृत्यूचे द्वार ठरत असून गेल्या तीन महिन्यात या रुग्णालयात ४९ नवजात बालके दगावली असल्याची धक्काय्यदक माहिती समोर आली आहे. दगावलेली सर्व नवजात बालके ही एनआयसीयुमधील असून विशेष म्हणजे यामध्ये अडीच किलोच्या वर वजनाच्याही काही नवजात बालकांचा देखील समावेश आहे. धक्कादायक बाब म्हणजे नवजात बालकांचा मृत्यू दर हा सरासरी सात टक्के असायला हवा, तोच मृत्यू दर २३ टक्यांच्या वर गेला आहे. गेल्या चार वर्षात हा दर २० टक्क्यांच्या खाली आलेला नाही. 'या महिलेने कळवा रुग्णालयात प्रसूतीसाठी नाव नोंदणी केली होती. ही महिला आठ महिन्यांची गर्भवती होती. त्यामुळे तिची प्रसूतीची वेळ आली नव्हती. जेव्हा सकाळी ९ च्या दरम्यान ही महिला आली तेव्हा तिची रुग्णालयाच्या बाहेरच प्रसूती झाली. रुग्णालयाच्या वतीने तातडीने या महिलेला शस्त्रक्रिया विभागात नेऊन तिच्यावर उपचार सुरु केले. यामध्ये एका बालकाचे वजन १.४ किलो असल्याने ते फार अशक्त होते. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या बालकाचे वजन दोन किलोच्या वर असल्याने हे बालक व्यवस्थित आहे, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनिरुद्ध माळगावकर यांनी दिली.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600