जिल्हा

दोन इमारतींचे भाग कोसळले

ठाणे: वागळे आणि मुंब्रा परिसरातील दोन इमारतींच्या छताचा आणि गॅलरीचा काही भाग कोसळला असून मुंब्रा येथिल दुर्घटनेत एक महिला किरकोळ जखमी झाली तर दोन्ही इमारतींमधील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. मुंब्रा-कौसा भागातील कादर पॅलेस येथे असलेल्या रोझ गार्डन या चार मजली ए विंग इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील छताचे प्लास्टर काल दुपारी १२च्या दरम्यान पडले. त्यामध्ये ७० वर्षांच्या ज्येष्ठ महिला शमीम बानू यांच्या हाताला आणि गुडघ्याला किरकोळ जखमा झाल्या आहेत. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन धोकादायक भाग बाजूला काढला आहे. दरम्यान रात्री उशिरा वागळे भागातील पंच परमेश्वर मंदिराजवळ पडवळ नगर येथिल तळ अधिक तीन मजली इमारतीच्या छताचा आणि गॅलरीचा भाग कोसळल्याची माहिती माजी नगरसेवक दीपक वेतकर यांनी वागळे अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष यांना दिली. रात्री सर्व वरिष्ठ अधिकारी तसेच माजी नगरसेवक राम रेपाळे हे दुर्घटनास्थळी पोहचले होते. ही इमारत ३० ते ४० वर्षे जुनी असून त्यामध्ये राहणाऱ्या १७ कुटुंबांची राहण्याची तात्पुरती सोय हजुरी येथिल रेंटल इमारतीमध्ये करण्यात आली असून ही इमारत तोडण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. 9:45 pm Forwarded

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600