ठाण्यात मेट्रो, इंटर्नल मेट्रो, फ्री वे, कोस्टल रोड, ट्वीन टनेल, आयफेल टॉवरच्या धर्तीवर ठाण्यात देखिल ट्वीन टॉवर उभारण्यात येणार असून ठाणेकरांना जलद वाहतूक सेवा मिळावी यासाठी लवकरच पॉड टॅक्सीच्या सेवेचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले.
ठाण्यावर धर्मवीर आनंद दिघे, बाळासाहेब ठाकरे यांनी प्रेम केले आहे. ठाण्याचे वातावरण इतर शहराच्या मानाने थंड आहे. हेलिकॉप्टरने पहिले तर ठाण्यात मोठ्या प्रमाणावर हिरवाई दिसत असल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले. महापालिकेने अतिशय कमी वेळेत पत्रकार कक्षाचे काम केल्याने त्यांनी महापालिका आयुक्तांचे अभिनंदन केले. उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी पत्रकार कक्षाचे काम करण्याचे आदेश दिल्यानंतर हे काम अवघ्या १५ दिवसांत पूर्ण करून त्याचे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे यांनी प्रस्तावना केली. महापौर शर्मिला पिंपळोलकर, खा.ज्योती वाघमारे, सभागृह नेते हणमंत जगदाळे, महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, प्रशांत रोडे, गटनेते पवन कदम, माजी महापौर मिनाक्षी शिंदे, महापालिकेतील नगरसेवक उपस्थित होते.
जिल्हा
ठाण्यात धावणार पॉड टॅक्सी, उभे राहणार ट्वीन टॉवर!

फोटो: ठाणे वैभव
उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नुतनीकृत पत्रकार कक्षाचे उदघाटन
ठाणे: मॉल आणि सोसायटीच्या थेट दारात जाण्याची सुविधा ठाणेकरांना मिळणार असून लवकरच ठाण्यात पॉड टॅक्सीच्या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. ठाणे तिथे काहीच उणे राहणार नाही, असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
ठाणे महापालिकेतील विस्तार आणि सुशोभिकरण करण्यात आलेल्या पत्रकार कक्षाचे उदघाटन उपमुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी शुभेच्छा देताना त्यांनी विश्वास व्यक्त केला की पूर्वी पुणे तिथे काय उणे असे बोलले जात होते, आत्ता ठाणे तिथे काय उणे असे म्हटले जाणार आहे.
ठाण्यात मेट्रो, इंटर्नल मेट्रो, फ्री वे, कोस्टल रोड, ट्वीन टनेल, आयफेल टॉवरच्या धर्तीवर ठाण्यात देखिल ट्वीन टॉवर उभारण्यात येणार असून ठाणेकरांना जलद वाहतूक सेवा मिळावी यासाठी लवकरच पॉड टॅक्सीच्या सेवेचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले.
ठाण्यावर धर्मवीर आनंद दिघे, बाळासाहेब ठाकरे यांनी प्रेम केले आहे. ठाण्याचे वातावरण इतर शहराच्या मानाने थंड आहे. हेलिकॉप्टरने पहिले तर ठाण्यात मोठ्या प्रमाणावर हिरवाई दिसत असल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले. महापालिकेने अतिशय कमी वेळेत पत्रकार कक्षाचे काम केल्याने त्यांनी महापालिका आयुक्तांचे अभिनंदन केले. उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी पत्रकार कक्षाचे काम करण्याचे आदेश दिल्यानंतर हे काम अवघ्या १५ दिवसांत पूर्ण करून त्याचे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे यांनी प्रस्तावना केली. महापौर शर्मिला पिंपळोलकर, खा.ज्योती वाघमारे, सभागृह नेते हणमंत जगदाळे, महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, प्रशांत रोडे, गटनेते पवन कदम, माजी महापौर मिनाक्षी शिंदे, महापालिकेतील नगरसेवक उपस्थित होते.
ठाण्यात मेट्रो, इंटर्नल मेट्रो, फ्री वे, कोस्टल रोड, ट्वीन टनेल, आयफेल टॉवरच्या धर्तीवर ठाण्यात देखिल ट्वीन टॉवर उभारण्यात येणार असून ठाणेकरांना जलद वाहतूक सेवा मिळावी यासाठी लवकरच पॉड टॅक्सीच्या सेवेचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले.
ठाण्यावर धर्मवीर आनंद दिघे, बाळासाहेब ठाकरे यांनी प्रेम केले आहे. ठाण्याचे वातावरण इतर शहराच्या मानाने थंड आहे. हेलिकॉप्टरने पहिले तर ठाण्यात मोठ्या प्रमाणावर हिरवाई दिसत असल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले. महापालिकेने अतिशय कमी वेळेत पत्रकार कक्षाचे काम केल्याने त्यांनी महापालिका आयुक्तांचे अभिनंदन केले. उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी पत्रकार कक्षाचे काम करण्याचे आदेश दिल्यानंतर हे काम अवघ्या १५ दिवसांत पूर्ण करून त्याचे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे यांनी प्रस्तावना केली. महापौर शर्मिला पिंपळोलकर, खा.ज्योती वाघमारे, सभागृह नेते हणमंत जगदाळे, महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, प्रशांत रोडे, गटनेते पवन कदम, माजी महापौर मिनाक्षी शिंदे, महापालिकेतील नगरसेवक उपस्थित होते.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600