जिल्हा
आंबिवली इराणी वस्तीत पोलिसांचे कॉम्बिग ऑपरेशन
आंबिवली इराणी वस्तीत पोलिसांचे कॉम्बिग ऑपरेशन
फोटो: ठाणे वैभव
दोन सराईत चेनचोर अटकेत
कल्याण: कल्याणजवळील आंबिवली येथील इराणी वस्तीत कल्याण खडकपाडा आणि नवी मुंबई पोलिसांच्या पथकाने काल मध्यरात्री कॉम्बिंग ऑपरेशन राबवत दोन इराणी सराईत चेन चोरांना अटक केली.
मुसा अनु सय्यद आणि काबुली नौशाद सय्यद अशी इराणी चोरट्यांची नावे आहेत. या दोघांविरोधात नवी मुंबईसह अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या कारवाईसाठी पोलिसांनी आधी कृती आराखडा तयार केला आणि त्यानंतर थेट या इराणी वस्तीतील घरांवर धाड टाकत त्यांना ताब्यात घेतले.
नवी मुंबई येथे घडलेल्या चेन चोरीच्या गुन्ह्यात मुसा अनु सय्यद, काबुली नौशाद सय्यद हे दोघे पसार होते. नवी मुंबई पोलिसांचे पथक या चोरट्यांच्या मागावर होते. ते कल्याणजवळील आंबिवली येथील इराणी वस्तीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. आंबिवली येथील इराणी वस्ती चेन चोरांचे आश्रयस्थान म्हणून कुप्रसिद्ध आहे. या वस्तीतून आजमितीला अनेक सराईत इराणी चोरट्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अनेकदा अटक करायला गेलेल्या पोलिसांवर या इराणी जमावाने हल्ला देखील केल्याच्या घटना या आधी देखील घडल्या होत्या.
काल मध्यरात्रीच्या सुमारास खडकपाडा पोलीस ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांच्या संयुक्त पथकाने मोठ्या पोलीस फौज फाट्यासह आंबिवली गाठत इराणी वस्तीत कॉम्पिंग ऑपरेशन सुरू केले. मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास सुरू झालेले हे कॉम्बिग ऑपरेशन पाच वाजता संपलं. याच दरम्यान पोलिसांनी मुसा अनु सय्यद, काबुली नौशाद सय्यद या दोघांच्या घरात झडप घालत या दोघांनाही बेड्या ठोकल्या आहेत.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600