जिल्हा

प्रबोध डावखरे राष्ट्रवादीत

प्रबोध डावखरे राष्ट्रवादीत
प्रबोध डावखरे राष्ट्रवादीत फोटो: ठाणे वैभव
मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत प्रवेश मुंबई : स्व. वसंतराव डावखरे यांचे सुपुत्र आणि सुप्रसिद्ध उद्योजक प्रबोध डावखरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ज्येष्ठ नेते तथा अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आणि स्व: अजित पवार यांनी उभ्या केलेल्या जनसंपर्क व सर्वसमावेशक राजकारणाच्या विचारांना पुढे नेण्यासाठी पक्षाचे युवा नेते तथा खासदार पार्थ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रवेश केल्याचे श्री. डावखरे यांनी सांगितले. यावेळी श्री. भुजबळ यांनी श्री. डावखरे यांचे पक्षात स्वागत करत त्यांच्या पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना श्री. भुजबळ म्हणाले की, “वसंतराव डावखरे यांनी अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात निष्ठेने काम केले. विधान परिषदेसह विविध जबाबदाऱ्या त्यांनी समर्थपणे पार पाडल्या. स्व: अजितदादा पवार यांच्यावर त्यांची कायम निष्ठा राहिली. आज त्यांचे सुपुत्र प्रबोध डावखरे पक्षात प्रवेश करत आहेत, ही आनंदाची बाब आहे. ते यशस्वी उद्योजक असून फिटनेस आणि जिम व्यवसाय क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय काम उभं केलं आहे. पक्षाकडून त्यांना योग्य सन्मान आणि संपूर्ण पाठबळ दिलं जाईल. त्यांनी निर्धास्तपणे काम करावं, आम्ही त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी माजी मंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, “प्रबोध डावखरे यांचे पक्षात स्वागत आहे. ते एक यशस्वी व्यावसायिक आहेत. त्यांचे वडील वसंतराव डावखरे यांनी ठाणे महानगरपालिकेचे महापौर, विधान परिषद सदस्य आणि उपसभापती म्हणून कार्य केले. स्व: अजितदादा पवार यांच्या विचारांचा वारसा आणि आपल्या वडिलांचा राजकीय-सामाजिक वारसा पुढे नेत प्रबोध डावखरे संघटनेत प्रभावी काम करतील, असा विश्वास आहे.” पक्षप्रवेशानंतर प्रबोध डावखरे म्हणाले की, “आजचा दिवस माझ्यासाठी अत्यंत भावनिक आहे. माझ्या वडिलांनी आपलं संपूर्ण आयुष्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी दिलं. स्व: अजितदादा पवार यांच्यावरील त्यांची निष्ठा आणि पक्षाशी असलेली बांधिलकी हीच माझ्यासाठी प्रेरणा आहे. आज मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करताना मन भरून आलं आहे. विशेषतः खासदार पार्थदादा पवार यांचे मी मनापासून आभार मानतो. त्यांनी मला पक्षप्रवेशासाठी मोलाचं सहकार्य केलं. तसेच ठाणे जिल्ह्यात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करेन,” अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, आमदार संजय बनसोडे, आ. प्रताप पाटील चिखलीकर, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, प्रवक्ते संजय तटकरे, प्रदेश सरचिटणीस सुरज चव्हाण, प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला, सहकोषाध्यक्ष संजय बोरगे, अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष नाजेर काझी, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी तसेच मुंबई महिला कार्याध्यक्ष मनीषा तुपे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600