जिल्हा

श्रावणात भाज्यांचे भाव उतरले

ठाणे: हिंदू धर्मातील पवित्र महिना म्हणून ओळखला जाणारा श्रावण महिना सुरू झाला असून नेहमीपेक्षा यंदा भाज्यांचे भाव उतरले आहेत. 15 दिवसांपूर्वी भाज्यांची आवक कमी असल्याने भाज्यांचे भाव कडाडले होते. मात्र ऐन श्रावणात भाज्या स्वस्त झाल्याने ठाणेकरांना दिलासा मिळाला आहे. ठाण्यातील बाजार पेठांमध्ये भाज्यांची आवक वाढली असून मेथी, कांद्याची पात, शेवग्याची शेंग, माठ, अळूची पाने, कोथिंबीर यांसह काही भाज्यांचे दर कमी झाले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या महिन्यात नैसर्गिक आपदांमुळे भाज्यांचे भाव दुपटीने वाढले होते. मात्र आता समाधानकारक पाऊस आणि आवक वाढल्यामुळे भाज्यांचे दर जवळपास किलोमागे 10 ते 20 रुपयांनी घसरले आहेत. आधीचे बाजार भाव : 1. मेथी - 40 रू. जुडी 2. शेपू - 30 रू. जुडी 3. कोथिंबीर - 30 रू. जुडी 4. पालक - 20 रू. जुडी 5. कांद्याची पात - 20 रू. जुडी 6. फ्लॉवर - 40 रू. नग 7. पत्ता कोबी - 30 रू. नग 8. भेंडी - 40 रू. किलो 9. टोमॅटो - 60 रू. किलो 10. लिंबू - 20 रू. (एक मोठा) तर 20 रू. (3 छोटे) 11. लसूण - 60 रू. किलो 12. शेवग्याच्या शेंगा - 40 रू. जुडी 13. अळूची पाने - 30 रू. जुडी सध्याचे बाजार भाव : 1. मेथी - 20 रू. जुडी 2. शेपू - 20 रू. जुडी 3. कोथिंबीर - 20 रू. जुडी 4. पालक - 20 रू. जुडी 5. कांद्याची पात - 20 रू. छोटी जुडी, 30 रू. मोठी जुडी 6. फ्लॉवर - 40 रू. नग 7. कोबी - 10 रू. छोटा आणि 20 रू. मोठा 8. भेंडी - 30 रू. पाव किलो 9. टोमॅटो - 50 रू. किलो 10. लिंबू - 20 रू. 3 मोठे किंवा 8 छोटे 11. लसूण - 50 रू. किलो 12. शेवग्याच्या शेंगा - 20 रू. जुडी 13. अळूची पाने -50 रू. 2 जुडी

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600