जिल्हा

पब, आणि दारूची दुकाने आयटीत ऐटीत आहेत सुरू!

उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे कारवाईचे आदेश आनंद कांबळे/ठाणे : वागळे भागातील आय टी सेंटरमध्ये उघडण्यात आलेली दारूची दुकाने, बिअर बार आणि पब बंद करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संदिप मारणे आणि न्यायमूर्ती अलोक आराध्ये यांच्या खंडपिठाने दिल्यामुळे वागळे भागातील रात्रीच्या धिंगाण्यावर चाप बसणार आहे. एमआयडीसीच्या भूखंडावरील अनेक कारखाने बंद पडल्याने या भूखंडावर माहिती व तंत्रज्ञान सेंटर उभारण्यासाठी उद्योगपतीना भूखंड देण्यात आले होते. या भागात मोठ्या प्रमाणावर कॉल सेंटर उभारण्यात आल्याने तसेच आय टी सेंटर उभारले गेल्याने अनेक उच्चशिक्षित तरुणांना रोजगार मिळाला आहे. या भागातील कॉल सेंटरमध्ये हजारो तरुण नोकरीकरिता येतात. या तरुणांची खाण्यापिण्याची सोय करण्यासाठी हॉटेल उभारणे आवश्यक असताना आय टी सेंटरच्या इमारतीच्या तळमजल्यावर तसेच या भागातील अनेक भूखंडावर बार, पब आणि दारूची दुकाने उघडण्यात आली होती. एका जागरूक ठाणेकराने एमआयडीसीला १८जून २०२४ला तक्रार करुन मद्याची दुकाने, पब आणि बिअर बार बंद करण्याची विनंती केली होती, परंतु एमआयडीसीने तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याने त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर सुनावणी झाली. त्यामध्ये याचिकाकर्त्याने या भागात आयटी सेंटरकरिता एमआयडीसीने भूखंड दिले असून त्या करीताच या भूखंडाचा उपयोग होणे गरजेचे असताना येथे बेकायदेशीरपणे बार, पब आणि मद्याची दुकाने उघडण्यात आली असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर १७ जून २०२५ला न्यायमूर्ती संदिप मारणे आणि न्यायमूर्ती अलोक आराध्ये यांच्या खंडपिठाने ठाणे पोलिस, उत्पादन शुल्क विभाग जिल्हाधिकारी आणि एमआयडीसी यांना या भागातील पब, दारूची दुकाने आणि बिअर बार बंद करण्याचे आदेश दिले. याचिकाकर्त्याने केलेल्या तक्रारीची दखल घेऊन कारवाई करावी असे आदेश दिल्याने या भागातील आय टी सेंटरमधील बार, पब आणि बिअर बारच्या विरोधात कारवाई केली जाणार आहे. वागळे भागातील आय टी सेंटर परिसरातील हॉटेल रात्रीच्या वेळी फुल्ल असतात. येथिल पब आणि बिअर बारमध्ये तरुणाई मद्य रिचवताना नजरेस पडतात. अनेक तरुण-तरुणी सिगारेटचे झुरके सोडताना ठाणेकरांच्या नजरेस पडत असतात. न्यायालयाने दिलेल्या या निर्णयामुळे या भागातील धांगडधिंगा बंद होणार आहे. या निर्णयाचे त्याचे ठाणेकरांनी स्वागत केले आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600