महाराष्ट्र

ठाण्यातील पुराणपोळ्यांनी अंबानींचा लग्नसोहळा केला गोड

ठाणे: 'भास्कर पुरणपोळी घर' या प्रसिद्ध मुंबईस्थित ब्रँडने जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, बीकेसी, मुंबई येथे आयोजित झालेल्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या भव्य विवाह सोहळ्यात आपली स्वादिष्ट पुरणपोळी दिली. ब्रँडची सर्वात लोकप्रिय कोकोनट पुरणपोळी (भारतीय पॅनकेक) अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या भव्य लग्न सोहळ्यात उपस्थित दक्षिण भारतीय सुपरस्टार रजनीकांत, ब्लॉकबस्टर निर्माता दिग्दर्शक राजकुमार हिरानी, क्रिकेटर कुमार संगकारा, जावेद जाफरी आणि अनेक परदेशी पाहुण्यांना आवडली. असंख्य भारतीय अभिनेते, तारे, राजकारणी तसेच परदेशी सेलिब्रिटींना देखील ही पुरणपोळी आवडली. 'भास्कर पुरणपोळी घर'ने दुजोरा दिला की त्यांनी अंबानींच्या लग्नात पुरणपोळीचे सहा प्रकार दिले होते. त्यामधली नारळ पुरणपोळी सर्व पाहुण्यांना खूप आवडली आणि त्यांच्यासाठी हा निश्चितच आयुष्यभराचा अविस्मरणीय अनुभव होता. पुरणपोळी घराचे संस्थापक आणि भागीदारांपैकी एक विठ्ठल शेट्टी यांनी म्हटले की, ”अंबानींच्या लग्नात उपस्थित राहून आम्हाला खूप आनंद झाला. आमचा प्रवास तीन वर्षांपूर्वी सुरू झाला आणि तेव्हापासून आम्ही महाराष्ट्रात अभिमानाने सहा आऊटलेट्स तीन मुंबईत आणि तीन पुण्यातस्थापन केल्या आहेत. आमच्या लेटेस्ट आउटलेटचे उद्घाटन नुकतेच लोकप्रिय अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांच्या हस्ते झाले.” विठ्ठल शेट्टी, भास्कर केआर आणि सौरभ चौधरी यांनी म्हंटले की "अंबानींच्या लग्नाचा भाग बनणे हा एक पूर्ण सन्मान आहे. आम्ही आमच्या सर्व ग्राहकांचे आणि आदरणीय पाहुण्यांचे आमच्या ब्रँडवरील अतुट समर्थन आणि प्रेमाबद्दल मनापासून आभार मानतो. ." “पुरणपोळी घर”आपल्या ग्राहकांच्या सततच्या पाठिंब्याबद्दल आणि पाहुण्यांच्या उपस्थितीसाठी त्यांचे मनापासून आभारी आहे. त्यांच्या प्रवासाचा एक भाग बनल्याबद्दल आणि त्यांच्या मनातील पुरणपोळी घरावर प्रेम दाखवल्याबद्दल आम्ही सर्वांचे आभारी आहोत.”

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600