जिल्हा

राज ठाकरे आणि शेलार यांचे एकमेकांवर टीकास्त्र

कल्याण: कर्नाटक विधानसभेत काँग्रेसला मिळालेले यश हे भारत जोडो यात्रेचा परिणाम आहे, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये दिली होती. यावर घरात बसून स्वप्न बघणारे स्वप्नातल्या प्रतिक्रिया देतात, अशी टीका आशिष शेलार यांनी केली होती. त्याला आता राज यांनी कल्याणमध्ये जोरदार प्रत्युत्तर दिले. मुळात अशा गोष्टी त्यांना सुचतात जे निवडणुका आल्या की, नाक्यावर सभा घेतात, अशी टीका ठाकरे यांनी शेलार यांचे नाव न घेता केली. भारत जोडो यात्रेचा परिणाम कर्नाटकाच्या विजयात झाला, हे तुम्ही मोठ्या मनाने मान्य केलेच पाहिजे. आपण एखाद्या पराभवानंतर काय बोध घेतो, आपल्याला तो घ्यायचाच नसेल तर वागा तसेच, असं राज ठाकरे म्हणाले. ते पुढे म्हणतात, ज्यांची पोच नाही, त्यांना अशा गोष्टी सूचतात. मुळात यांचं अस्तित्व हे नरेंद्र मोदींमुळे आहे. त्यांना खाली कोण ओळखतो, असंदेखील ठाकरे यावेळी म्हणाले. कल्याणमधील गटबाजीबाबत त्यांना विचारणा केली असता कल्याणमध्ये पक्षात कोणत्याही प्रकारची गटबाजी नाही, एकवेळ मतभेद असतील याकडे त्यांनी लक्ष वेधले.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600