जिल्हा

प्रेमसंबंधास नकार; तरुणीची हत्या

ठाणे : भिवंडी शहरात प्रेमसंबंधास नकार दिल्याच्या रागातून, एका २४ वर्षीय तरुणाने २३ वर्षीय तरुणीची राहत्या घरातच हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. खळबळजनक बाब म्हणजे, मोठ्या बहिणीला वाचवण्यासाठी गेलेल्या लहान बहिणीवर वार करून तिलाही गंभीर जखमी करण्यात आले. ही घटना भिवंडी शहरातील एका चाळीत घडली. याप्रकरणी हत्या करणाऱ्या आरोपीच्या विरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तर राजू सिंग (२४) असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव असून, तो फरार झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजू हा मूळचा उत्तर प्रदेशातील आहे. तर मृत तरुणीही मूळची उत्तर प्रदेशातील भदोई जिल्ह्यातील आहे. सद्यस्थितीत ते दोघेही कुटुंबासोबत भिवंडी शहरातील एका चाळीत भाड्याच्या खोलीत राहतात. त्यामुळे ते एकमेकांना ओळखत होते. मृत तरुणीने राजूला प्रेमसंबंधास नकार दिला होता. याच रागातून सोमवारी (२८ ऑक्टोबर) रात्री सव्वा अकराच्या सुमारास आरोपी राजूने तरुणीची हत्या केली. दुसरीकडे आतरुणीची लहान बहीण तिला वाचवण्यासाठी गेली असता, आरोपीने तिच्यावरही वार करत तिलाही गंभीर जखमी केले. या प्रकरणी मृत तरुणीच्या वडिलांच्या तक्रारीनुसार राजूच्या विरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांची कुणकुण लागताच आरोपी राजू हा घटनास्थळावरून फरार झाला. पोलीस त्याचा सीसीटीव्हीच्या आधारे कसून शोध घेत आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) अतुल अडुरकर करत आहेत.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600