जिल्हा

पावसाचे समाधान पण कोंडीने हैराण

पावसाचे समाधान पण कोंडीने हैराण
पावसाचे समाधान पण कोंडीने हैराण फोटो: ठाणे वैभव
ठाण्यात दीड दिवसात द्विशतक ठाणे : मागिल दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने धुवाधार बॅटिंग करून ३६ तासांत द्विशतक ठोकले. महिनाभर गायब झालेला पाऊस गेल्या तीन दिवसांत जवळपास मागील वर्षाच्या नोंदीजवळ जाऊन पोहोचला आहे. या मुसळधार पावसाने ठाण्याचे जनजीवन विस्कळीत झालेच पण वाहतुकीवरही परिणाम झाला होता. बुधवार ते गुरुवार अवघ्या ३६ तासांत २०० मि.मी. पावसाची नोंद केली आहे. गुरुवारी दुपारनंतर पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरीही सकाळी साडेआठ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत ४० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यातील एकूण पर्जन्यमान ६०१.२८ मि.मी.वर पोहोचले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ८६५.१५ मि.मी. पाऊस झाला होता. संततधार सरींचा परिणाम शहरातील जनजीवन आणि वाहतुकीवर झाला असून घोडबंदर रोड, मुंबई-नाशिक महामार्ग, भिवंडी आणि कशेळी मार्गावरील वाहतूक मंदावल्याचे दिसले. आज सकाळी ८.३० वाजेपर्यंत शहरात १५७.९३ मिमी पावसाची नोंद झाली होती. यावर्षी सुरुवातीला पावसाने ओढ दिली. पण गेल्या दोन दिवसांपासून पावसाचे जोरदार आगमन झाले. सततच्या पावसामुळे शहरातील काही पूर्व प्राथमिक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. मुसळधार पावसामुळे घोडबंदर रोडवरील अनेक सखल भाग, मुंबई-नाशिक महामार्गावरील कशेळी परिसर तसेच भिवंडीतील काही भागांत पाणी साचले. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आणि अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. कामावर जाणाऱ्या नागरिकांना तसेच मालवाहतूक वाहनांनाही मोठा फटका बसला. मुसळधार पावसामुळे ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे ७४ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यामध्ये २० झाडे पडणे, १५ झाडांच्या फांद्या पडणे, १३ धोकादायक झाडांच्या तक्रारी, २० ठिकाणी पाणी साचणे, एका ठिकाणी आग लागणे, इमारतीचा काही भाग कोसळण्याची एक घटना, जलवाहिनी गळतीची एक तक्रार आणि इतर तीन तक्रारींचा समावेश आहे. या सर्व घटनांवर महापालिकेच्या विविध विभागांकडून तातडीने उपाययोजना करण्यात आल्या. गुरुवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच असल्याने प्रशासनाकडून सखल भागांवर आणि पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असलेल्या ठिकाणांवर लक्ष ठेवण्यात आले आहे. आपत्ती व्यवस्थापन कक्ष, अग्निशमन दल आणि महापालिकेची यंत्रणा सतर्क असून नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, तसेच आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600