जिल्हा

प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेत आरोग्य वर्धक ज्यूसचे वाटप

पडघा :  टी.ए.पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये ७५ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष शशांक तांबोळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. 
 
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून डाबर कंपनीच्या वतीने व महेंद्र फक्के यांच्या प्रयत्नातून विद्यार्थ्यांना आरोग्यवर्धक ज्यूसचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ व निरोगी राहावे, पोषक आहार आणि आरोग्य याचे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात किती महत्त्व आहे हे यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष शशांक तांबोळी यांनी आपल्या भाषणात  सांगितले. यावेळी विद्यार्थांनी देशभक्तीपर गीते, भाषणे व विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600