जिल्हा

ठामपा प्रभाग १ मधील विकासकामांचा आढावा

अधिकाऱ्यांसोबत शिवसेना विभागप्रमुख रवी घरत यांची पाहणी

ठाणे : शिवसेना विभागप्रमुख रवी घरत यांनी ठाणे घोडबंदर रोड परिसरातील प्रभाग क्रमांक १ मधील विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी पाहणी दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी घनकचरा व्यवस्थापन, नालेसफाई, विकासकामे, पायवाट सुशोभीकरण आणि पाणीपुरवठा यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले. नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन तातडीने उपाययोजना करण्यावर त्यांनी भर दिला. घनकचरा व्यवस्थापन आणि नालेसफाईमुळे भर पावसाळ्यामध्ये नागरिकांना पाणी साचण्याच्या त्रासाला सामोरे जावे लागू नये यासाठी, शिवसेना विभागप्रमुख रवी घरत यांनी ठाणे महानगरपालिका घनकचरा विभागाचे शायुराज कांबळे यांच्यासोबत पाहणी दौरा केला. या दौऱ्यात प्रभागातील विविध भागांतील गटारे तातडीने साफ करण्याच्या सूचना देण्यात आल्या. विशेषतः, डी-मार्ट ते वाघबीळ खाडीपर्यंत तसेच साईनगर परिसरातील आणि प्रभागातील इतर विविध ठिकाणच्या नाल्यांची सफाई तातडीने करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले. रवी घरत यांनी ठाणे महापालिकेचे कार्यकारी अभियंता संजय कदम आणि उपअभियंता राजेंद्र कुसुरकर यांच्या उपस्थितीत विकासकामांचा आढावा घेतला. यावेळी विजय ओरिव्हिया ते वाघबीळ गाव दरम्यानच्या रस्त्याचे डांबरीकरण आणि गटारे बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या. वाघबीळ जुन्या गावात गेल्या १०-१५ दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे शालेय विद्यार्थ्यांना, महिलांना आणि नोकरदार व्यक्तींना शाळेत किंवा कामावर जाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. ही गंभीर बाब लक्षात घेऊन, स्थानिक गावकरी आणि शेतकरी बांधवांशी चर्चा करून पायवाट विकसित करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या कामाचीही पाहणी करण्यात आली. प्रभाग क्रमांक १ मधील विविध ठिकाणांहून पाण्याच्या तक्रारी सातत्याने प्राप्त होत होत्या, तसेच वाघबीळ गाव परिसरात पाण्याची कमतरता जाणवत असल्याचे निदर्शनास आले होते. या पार्श्वभूमीवर रवी घरत यांनी कनिष्ठ अभियंता संजय शेटे यांच्यासोबत प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पाहणी दौरा केला. त्यांनी नागरिकांच्या समस्या समजून घेतल्या आणि त्वरित उपाययोजना राबवण्यासाठी संबंधित विभागाशी चर्चा केली.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600