जिल्हा

आरटीओचे 'कल्याण'!

उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, कल्याणची दमदार कामगिरी ४३७.८० कोटींची विक्रमी महसुल ठाणे: उप प्रादेशिक परिवहन कार्यालय कल्याण यांनी आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये तब्बल ४३७ कोटी ८० लाख रूपयांचा विकमी महसूल शासनाच्या तिजोरीत जमा करत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे, शासनाने दिलेल्या उद्दिष्टापेक्षा १०० टक्क्यांहून अधिक महसूल वसुली करण्यात कार्यालयाला यश आले आहे, अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांनी दिली आहे. उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, कल्याण यांना प्राप्त महसूलामध्ये सर्वाधिक हिस्सा वाहन नोंदणीमधून मिळाला आहे. वर्षभरात एकूण एक लाख ८,१२५ वाहनांची नोंदणी करण्यात आली. यामध्ये दुचाकी ७९,५५७, चारचाकी १६,८२६, ऑटोरिक्षा ३,५७१, मालवाहू वाहने ४,२९२ तसेच प्रवासी वाहने व इतर वाहने यांचा समावेश आहे. मागील वर्षाच्या ३७२ कोटी २२ लाखांच्या महसुलाच्या तुलनेत यंदा लक्षणीय तब्बल ४३७ कोटी ८० लाख रूपयांची वाढ नोंदविण्यात आली असून, ही कामगिरी कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचा-यांच्या समन्वयपूर्ण आणि मेहनती प्रयत्नांचे फलित असून या यशामुळे कार्यालयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600