जिल्हा

प्रायोजकांसाठी सुरू धावाधाव; आता मॅरेथॉनची पळवापळवी

खासदार नरेश म्हस्के यांच्यासह माजी नगरसेवकांची बैठक ठाणे: तब्बल सहा वर्षांनी होत असलेल्या ठाणे महापालिकेच्या वर्षा मॅरेथॉनला प्रायोजक मिळत नसल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले असतानाच आता ही मॅरेथॉन शिवसेनेकडूनच हायजॅक होत असल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे. खा.नरेश म्हस्के आणि नगरसेवकांची बैठक झाल्याची माहिती मिळाल्यानंतर या चर्चेला बळ मिळू लागले आहे. १० ऑगस्ट रोजी होणाऱ्या या मॅरेथॉनसाठी ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या सूचनेनुसार, एकूण १० लाख ३८,९०० रुपयांची पारितोषिके, चषक अंक पदके देण्यात येणार आहेत. प्रत्येक गटातील प्रथम विजेत्यास एक लाख रुपयांचे पारितोषिक आहे. तर, प्रत्येक गटात प्रथम १० विजेत्यांना पारितोषिके व चषक देण्यात येणार आहेत. महापालिकांच्या निवडणुका झाल्या नसल्याने ठाणे महापालिकेत महासभा अस्तित्वात नाही. त्यामुळे वर्षा मॅरेथॉनची सर्व तयारी ही प्रशासनाला करावी लागणार आहे. सध्या महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने स्पर्धेच्या प्रयोजकत्वासाठी पालिका अधिकाऱ्यांची सध्या धावाधाव सुरु आहे. आतापर्यंतची तयारी पाहता प्रशासनाकडून आयोजन करत असताना त्यांना काही प्रमाणात अडचणी येत असल्याची चर्चा आहे आता या आयोजनात शिवसेनेनेही उडी घेतली असून यासंदर्भात खासदार नरेश म्हस्के यांच्यासह काही माजी नगरसेवकांची महापालिका मुख्यालयात एक महत्वाची बैठक झाली असून मॅरेथानचे नियोजन करण्यात आले आहे. गेल्या सहा वर्षांपासून ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन झाली नसली तरी, यापूर्वी झालेल्या मॅरेथॉनच्या आयोजनाची जबाबदारी सत्ताधारी शिवसेनाच घेत होते. त्यामुळे मॅरेथॉनवरील ही राजकीय पकड सुटू नये यासाठी मॅरेथॉन जरी प्रशासनाची असली तरी ही स्पर्धा आता शिवसेनेकडून हायजॅक करण्यात आली असल्याची जोरदार चर्चा पालिका वर्तुळात सुरु आहे. प्रशासनाकडूनही स्पर्धेच्या तयारीला वेग आला असून रविवारी ज्या मार्गावर स्पर्धक धावणार आहेत, त्या मार्गाची पाहणी देखील करण्यात आली आहे. स्पर्धेमध्ये स्पर्धकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत, यासाठी पाहणी करण्यात आली आहे. यापूर्वी मॅरेथॉनच्या आयोजनामध्ये शिवसैनिकांचा सक्रिय सहभाग असायचा. स्पर्धेच्या नियोजनामध्ये त्यांचा मोठा वाटा असायचा. यावेळीही काही जण स्वतःहून मॅरेथॉनच्या तयारीमध्ये आपला सहभाग नोंदवत आहेत. ते शिवसैनिकच असल्याने यामुळे प्रशासनाला चांगलीच मदत मिळत आहे. त्यामुळे हायजॅक होण्याचा काहीही संबंध नाही, अशी प्रतिक्रिया खा.नरेश म्हस्के यांनी दिली.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600