जिल्हा
कशेळी खाडीत युवकाची उडी घेऊन आत्महत्या
कशेळी खाडीत युवकाची उडी घेऊन आत्महत्या
फोटो: ठाणे वैभव
ठाणे : ठाणे येथील लोहमार्गाजवळ असेलल्या खाडीत 53 वर्षे वयाच्या इसमाने उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
रविवारी सकाळीच साधारण साडेआठ वाजता ही घटना घडल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन व टीडीआरएफच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
खाडीतील पाण्यात उडी घेणारा व्यक्ती बुडाला असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असून शोधकार्य सुरू सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते, मात्र, अद्याप संबंधित व्यक्तीचा शोध लागलेला नाही. उडी घेणाऱ्या व्यक्तीची माहिती अद्याप मिळाली नसून घटनेचे कारणही माहिती नाही. शोध मोहीम सुरू असताना घटनास्थळी नातेवाईक व स्थानिकांनीही गर्दी केली होती.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600