जिल्हा

शहापूर शिवसेना सोशल मीडिया प्रमुखपदी मीनाक्षी मडके-कथोरे

शहापूर शिवसेना सोशल मीडिया प्रमुखपदी मीनाक्षी मडके-कथोरे
शहापूर शिवसेना सोशल मीडिया प्रमुखपदी मीनाक्षी मडके-कथोरे फोटो: ठाणे वैभव
शहापूर: शहापूर तालुक्यातील राजकीय क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवणाऱ्या मीनाक्षी मडके-कथोरे यांची शिवसेना सोशल मीडिया तालुका प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते प्रकाश पाटील आणि जिल्हाप्रमुख मारुती धिंडें यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीचे अधिकृत पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
मीनाक्षी मडके-कथोरे यांना राजकारणाचा दांडगा अनुभव आहे. यापूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्षपद तसेच भाजपचे विधानसभा अध्यक्षपद यशस्वीपणे भूषविले आहे. एका साप्ताहिकाच्या संपादिका म्हणूनही त्या कार्यरत असून, जनसंपर्क आणि माध्यमांची त्यांना उत्तम जाण आहे. त्यांच्या याच अनुभवाचा विचार करून पक्षाने त्यांच्यावर सोशल मीडियाची मोठी जबाबदारी सोपवली आहे.
या नियुक्ती सोहळ्याप्रसंगी शिवसेना नेते व उपनेते रवींद्र फाटक (विभागीय संपर्क प्रमुख, भिवंडी-पालघर), नरेश मस्के (खासदार तथा संपर्कप्रमुख, भिवंडी लोकसभा), मारुती धिंडें (जिल्हाप्रमुख, ठाणे ग्रामीण), आणि प्रकाश वेखंडे (तालुकाप्रमुख) यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाला उपजिल्हाप्रमुख, संपर्क प्रमुख, संघटक, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, बाजार समिती संचालक, माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी सभापती तसेच पंचायत समिती सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच महिला आघाडी, युवासेना, शिक्षक सेना आणि अल्पसंख्याक विभागाचे पदाधिकारी व शिवसैनिकांनी या नियुक्तीचे स्वागत केले आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600