जिल्हा

बदलापूरच्या श्रेयस भोईरचे सलग सहा तास तबलावादन

बदलापूरच्या श्रेयस भोईरचे सलग सहा तास तबलावादन
बदलापूरच्या श्रेयस भोईरचे सलग सहा तास तबलावादन फोटो: ठाणे वैभव
विश्वविक्रमाची केली नोंद
बदलापूर : सलग सहा तास शास्त्रीय पद्धतीने तबला वादन करून बदलापूर येथील श्रेयस भोईर याने  जागतिक विश्वविक्रमाची नोंद केली आहे. दहावीमध्ये असलेल्या श्रेयस भोईर याला लहानपणापासून तबला वादनाची आवड होती. अंबरनाथ येथील गुरुकृपा संगीत विद्यालयात सुनील शेलार यांच्याकडून श्रेयस  तबला वादनाचे शिक्षण घेत आहे. मागील महिन्यात झालेल्या तबला वादन स्पर्धेत श्रेयस याने सलग सहा तास 16 सेकंद अखंडित तबला वादन करून विश्वविक्रम केल्याने त्याची इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. पूर्वी कलकत्ता येथील तबला वादकाने चार तास  तबला वादन केले होते. त्याचा विक्रम श्रेयस याने मोडला आहे.
श्रेयस याने त्याचे गुरु सुनील शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी 8 वाजून 22 मिनिटांपासून दुपारी 2 वाजून 22 मिनिटांपर्यंत यशस्वीरित्या पेशकार, कायदे, रेले, चलन, तुकडे, मुखडे, गत आणि चक्रदार या प्रकारात तबला वादन करून विक्रमांची नोंद केली आहे. हा रेकॉर्ड त्याने 15 फेब्रुवारीला रेकॉर्ड करून त्यांना पाठविला, आणि 18 फेब्रुवारीला रेकॉर्डची नोंद झाली.
बदलापूर येथील कारमेल या शाळेत शिकणारा श्रेयस यंदा दहावीला आहे. रोज दोन तास तबला वादनाचा रियाझ तो करतो. शाळेत हुशार विद्यार्थी असून नववीमध्ये त्याला 87 टक्के गुण मिळाले आहेत. तबला वादनासोबत त्याला वाचनाची देखील आवड आहे. श्रेयस याचे वडील दत्तात्रय भोईर अंबरनाथमधील आयुध निर्माणीमध्ये नोकरी करतात.
दुबई, कोलकाता, चंदीगढ, लखनौ, अहिल्यानगर, सोलापूर, पुणे तसेच कल्याण येथील गायन समाज संस्था आदी ठिकाणी झालेल्या तबला वादन स्पर्धेत श्रेयस याने प्रथम, द्वितीय क्रमांक पटकावले आहेत. याशिवाय अनेक जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कारावर मोहोर उमटवली आहे.
अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जागतिक पातळीवरील पुरस्कार त्याने प्राप्त केले आहेत, असे श्रेयस याचे वडील दत्तात्रय भोईर यांनी सांगितले. त्याच्या यशाबद्दल श्रेयस याचे गुरू सुनील शेलार आणि  त्याची आई ज्योती भोईर यांनी आनंद व्यक्त केला.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600