जिल्हा

ठाणे महापालिकेत शिवसेना-भाजप संघर्ष तीव्र

ठाणे महापालिकेत शिवसेना-भाजप संघर्ष तीव्र
ठाणे महापालिकेत शिवसेना-भाजप संघर्ष तीव्र फोटो: ठाणे वैभव
२३१ प्रस्तावांवरून सभागृहात संघर्ष; दोन्ही पक्षांकडून आरोप-प्रत्यारोप ठाणे : शिवसेना शिंदे गट आणि भाजपा यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला असून 'शिवसेनेची मनमानी आमचे नगरसेवक खपवून घेणार नाही', असा इशारा आ. संजय केळकर यांनी दिला. तर 'सत्तेत राहून विरोध करण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडा', असा टोला माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि ज्येष्ठ नगरसेवक विकास रेपाळे यांनी लगावला आहे. ठाणे महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत शिवसेनेने सत्तेच्या जोरावर कोणत्याही प्रकारची चर्चा न करता २३१ प्रस्ताव अवघ्या पाच मिनिटात कोणत्याही प्रकारची चर्चा न करता मंजूर केले होते, त्यावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपा यांच्यात संघर्ष झाला होता. भाजपाने सेनेच्या विरोधात तर सेनेच्या नगरसेवकांनी भाजपाच्या विरोधात घोषणाबाजी केली होती. राष्ट्रगीताचा आवामान झाला असा आरोप करत भाजपाने सेनेच्या नगरसेवकांच्या विरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला होता. तर सभागृहात गोंधळ घालणाऱ्या भाजपाच्या नगरसेवकांचे निलंबन करा अशी मागणी सेनेच्या नगरसेवकांनी महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्याकडे केली होती. त्या पार्श्वभूमीवर भाजपचे आ. संजय केळकर यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, शिवसेनेचा मनमानी कारभार आमचे नगरसेवक खपवून घेणार नाहीत. जे ठराव झाले त्यावर चर्चा होणे अपेक्षित आहे. हा सर्व पैसा ठाणेकर जनतेचा आहे. त्यांना आम्हाला उत्तर द्यायचे आहे. त्यामुळे नियमाने महापालिकेचे कामकाज होणे आवश्यक आहे. असा मनमानी कारभार आम्ही सहन करणार नाही. आम्ही निवडणुकीपूर्वीच युतीसोबत लढण्याच्या विरोधात होतो, आता युतीत असल्याने आम्हाला गृहीत धरता कामा नये, असा इशारा आ. केळकर यांनी दिला आहे. आम्ही दरवेळी युतीचा धर्म पाळतो, युती म्हणूनच आम्ही एकत्रित राहतो, तुम्ही सत्तेत राहता आणि युतीच्या मित्रपक्षाच्या विरोधातच घोषणाबाजी करत असाल तर सत्तेतून बाहेर पडा, कशाला पद घेता, असा टोला शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि ज्येष्ठ नगरसेवक विकास रेपाळे यांनी भाजपाला लगावला. गटनेत्यांच्या बैठकीत तुम्ही एक बाजू घेता आणि सभागृहात एक बाजू अशी दुटप्पी भूमिका घेण्यापेक्षा विरोधात काम करा, असा सल्ला या दोघांनी भाजपाला दिला आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600