महाराष्ट्र

दुर्मिळ पक्षांसह ३० पोपटांची तस्करी रोखली

ठाणे : खाजगी टुरिस्ट बसमधून वन्यजीवांच्या तस्करीचा डाव वाईल्ड वेल्फेअर असोसिएशन या वन्यजीव संरक्षक संघटनेने उधळला आहे. भिवंडी पडघा येथे केलेल्या या कारवाईत वन्यजीव रक्षकांनी तीन दुर्मिळ पक्षांसह ३० पोपट आणि कबुतरांना वनविभागाच्या स्वाधीन केले. हे वन्यजीव मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटमध्ये विक्रीसाठी नेण्यात येत होते, अशी माहिती संघटनेचे मानद वन्यजीव रक्षक राकेश मोहिते यांनी दिली. मालेगाव येथून २५ ऑगस्ट रोजी खाजगी टुरीस्ट बसच्या बॅटरीच्या कंपार्टमेंटमध्ये लपवून काही जण वन्यजीवांची तस्करी करीत असल्याची माहिती संघटनेला मिळाली. त्यानुसार, ठाणे जिल्हा वन्यजीव रक्षक राकेश मोहिते, सदस्य सुशील गायकवाड, अभिजीत मोरे, श्लोक सिंग, सुवेद रासम आदीनी पडघा टोलनाक्यावर सापळा रचला तसेच टोल नाका ओलांडण्यापूर्वीच पोलिसांच्या मदतीने बस थांबवून आपल्या एका सदस्याला बसमध्ये चढवले. त्यानंतर वनविभागाच्या मदतीने बस ठाण्यात आल्यावर बसची झाडाझडती घेतली असता लक्झरी बसच्या बॅटरीच्या कंपार्टमेंटमध्ये ३० रोझ रिंग पॅराकीट (पोपट), तीन दुर्मिळ ब्लॅक शोल्डर विंग काईट आणि कबुतरे व कोंबड्या असा मुद्देमाल हस्तगत केला. यातील कोंबड्या वगळता अन्य वन्यजीवांची पशुवैद्यकिय तपासणी करून त्यांची वन अधिवासात मुक्तता करण्यात आली. हे वन्यजीव मुंबईतील मदनपुरा, कॉफर्ड मार्केट येथे विक्रीसाठी नेण्यात येणार होते.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600