जिल्हा

ठाण्यात रंगल्या राज्यस्तरीय मास्टर्स बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा

ठाण्यात रंगल्या राज्यस्तरीय मास्टर्स बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा
ठाण्यात रंगल्या राज्यस्तरीय मास्टर्स बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा फोटो: ठाणे वैभव
ठाणे: ठाण्याच्या दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृहातील खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉल येथे ठाणे शहर व जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय मास्टर्स म्हणजेच वरिष्ठ गटातील (३५ वर्षांवरील) अजिंक्यपद स्पर्धेला संपूर्ण राज्यातून उदंड प्रतिसाद लाभला. एकूण पाच दिवस चालू असणाऱ्या या स्पर्धेत 35 वर्षांवरील पासून ते 75 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या वयोगटातील एकूण 45 विविध गटांमध्ये अनेक चुरशीचे सामने अनुभवण्यास मिळाले. 35 वर्षावरील पुरुषांच्या एकेरीत नवीन कुमार तसेच 40 वर्षांवरील पुरुषांच्या गटात नायझेल डीसा यांनी सुवर्णपदक पटकावले तर याच गटात अपूर्व जावडेकर हा उपविजेता ठरला. 45 वर्षांच्या पुरुषांच्या गटात एकेरीत सचिन सारडा यांनी बाजी मारली तर सिद्धार्थ पाटील हे रौप्य पदकाचे मानकरी ठरले. 55 वर्षावरील पुरुषांच्या दुहेरी गटात अयाज बिलावाला आणि शैलेश डागा यांनी विजेतेपद आपल्या नावे केले तर 65 वर्षांवरील पुरुषांच्या गटात दुहेरीमध्ये दिलीप सुकटणकर व मिलिंद पूर्णपात्रे यांनी बाजी मारली. 45 वर्षांवरील महिलांच्या दुहेरी गटात फारोग मुकादम आणि सुजा नायर यांनी कांस्यपदक पटकावले तर 50 वर्षांवरील महिलांच्या दुहेरी गटात चैत्राली नवरे व नाहीद दिवेचा हे अजिंक्यवीर ठरले. पारितोषिक वितरण समारंभास मोहन सुब्रमण्यम यांनी अध्यक्षपद भूषविले. ते गेली 40 ते 50 वर्षे बॅडमिंटन क्षेत्रात केवळ प्रशिक्षकच नव्हे तर विविध माध्यमांमधून या खेळाच्या प्रगतीसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यरत आहेत. या विशेष सोहळ्याला माजी राष्ट्रीय प्रशिक्षक संजीव सचदेवा आणि माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू कौशल चीमा हे देखील खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी ठाणे शहर व जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या टीमवर संपूर्ण राज्यभरातून स्तुतीसुमनांचा वर्षाव होत आहे. भविष्यात याच प्रकारे आपण राष्ट्रीय दर्जाच्या अनेक स्पर्धा देखील आयोजित करू आणि त्या यशस्वीरित्या पार देखील पाडून दाखवू, असे मत याप्रसंगी ठाणे शहर व जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकांत वाड यांनी व्यक्त केले.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600