जिल्हा
कल्याण पूर्वेत अनधिकृत बॅनर, होर्डिंग्जविरोधात धडक कारवाई
कल्याण पूर्वेत अनधिकृत बॅनर, होर्डिंग्जविरोधात धडक कारवाई
फोटो: ठाणे वैभव
कल्याण : कल्याण-डोंबिवली परिक्षेत्रात दुर्घटना टाळण्याच्या दृष्टिकोनातून अनधिकृत होर्डिंग हटविण्याबाबत कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी दिलेल्या निर्देशानुसार “ड” प्रभागातील अनधिकृत होर्डिंग्ज व बॅनर्सवर सहायक आयुक्त उमेश यमगर आणि त्यांच्या पथकाने निष्कासनाची धडक कारवाई गेल्या तीन दिवसांत केली.
या कारवाईमध्ये रस्त्याच्या दुतर्फा, दुभाजक आणि सार्वजनिक ठिकाणांवरील एकूण 27 बॅनर्स, पोस्टर्स हटविले. त्याचप्रमाणे संतोषनगर नाला शौचालयाजवळ 10×15 चे दोन होर्डिंग, संतोषनगर कमानीजवळ 15×15 चे एक होर्डिंग, तिसगाव नाका येथील 20×20 चे एक होर्डिंग, 'ड' प्रभाग क्षेत्रात 10×10चे दोन होर्डिंग, दुर्गा इंपिरियल, कल्याण शीळ रोड येथे 20×40 चे एक होर्डिंग, आमराई चौक ते विजयनगर रस्ता येथे 20×20 चे एक होर्डिंग अशा एकूण आठ होर्डिंग्जवर निष्कासनाची धडक कारवाई करण्यात आली.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600