जिल्हा

दुबईत अडकलेले विद्यार्थी आणि नागरिकांची घरवपासी सुरू

दुबईत अडकलेले विद्यार्थी आणि नागरिकांची घरवपासी सुरू
दुबईत अडकलेले विद्यार्थी आणि नागरिकांची घरवपासी सुरू फोटो: ठाणे वैभव
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मदतीचा हात ठाणे: दुबईमध्ये अडकलेल्या ठाणे जिल्ह्यासह राज्यभरातील १६४ पर्यटक आणि विद्यार्थ्यांना सुरक्षित मायदेशी परत आणण्यासाठी तातडीने दोन विशेष विमाने पाठवली असून सायंकाळपर्यंत सर्व सुरक्षित मुंबईत परततील, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. दुबईमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांनी गेल्या दोन दिवसांत संपर्क साधून मदतीची विनंती केल्याची माहिती देताना शिंदे म्हणाले की, संबंधितांशी दूरध्वनीवर संवाद साधून त्यांना धीर देण्यात आला. दुबईतील डॉक्टर संजीव पैठणकर, महाराष्ट्र मंडळाचे पदाधिकारी तसेच युवा सेनेचे राहुल कनाल हे तेथील पर्यटक व विद्यार्थ्यांच्या सतत संपर्कात होते. अचानक विमान सेवा रद्द झाल्याने प्रवाशांची मोठी अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे शिवसेनेच्या वतीने दोन विशेष विमाने पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली असून संबंधित प्रवासी मुंबईकडे रवाना झाले आहेत. पुणे, ठाणे, मुरबाड, शहापूर, अहिल्यानगर, मुंबई आदी ठिकाणांतील सुमारे 164 पर्यटक आणि नागरिकांचा यात समावेश आहे. सर्वांना सुरक्षितपणे मायदेशी आणण्याचे काम सुरू असून राज्य शासनानेही आवश्यक ते नियोजन केले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही परदेशात अडकलेल्या भारतीयांना सुरक्षित परत आणण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना केली असल्याचे शिंदे यांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन त्यांनी केले. दुबईतील हॉटेल मालकांशीही संपर्क साधून नागरिकांची गैरसोय होऊ नये याची खबरदारी घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मराठीतील आघाडीच्या अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगा अभिनय सुभेदार हा लंडनला जायला निघाला असता युद्धजन्य परिस्थितीमुळे कुवेतच्या विमानतळावर अडकला आहे. याबद्दल व्हिडिओद्वारे विशाखा यांनी सरकारकडे मदतीची याचना केली होती. या व्हिडिओची तत्काळ दखल घेऊन उपमुख्यमंत्री शिंदे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी राहुल गेठे यांनी अभिनय याच्याशी संपर्क करून त्याची विचारपूस केली. त्यानंतर शिंदे यांनीही विशाखा सुभेदार यांच्याशी फोनवरून संवाद साधून आमचे अधिकारी अभिनयच्या संपर्कात असून तो सध्या आहे त्या हॉटेलमध्ये त्याची राहण्याची सोय केली असल्याचे सांगितले. तसेच महाराष्ट्र मंडळाचे डॉ. पैठणकर यांनीही त्यांच्या लोकांना फोन करून त्याच्याशी संपर्कात राहण्यास सांगितले आहे. यासोबतच जशी विमानसेवा पूर्ववत होईल तसे त्याला पुन्हा मुंबईत सुखरूप आणण्यात येईल असेही शिंदे यांनी विशाखा यांना सांगून त्यांना याबाबत आश्वस्त केले.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600