जिल्हा

ठाण्याचे सुलक्षण कुलकर्णी झाले ओमान क्रिकेट संघाचे प्रशिक्षक

ठाण्याचे सुलक्षण कुलकर्णी झाले ओमान क्रिकेट संघाचे प्रशिक्षक
ठाण्याचे सुलक्षण कुलकर्णी झाले ओमान क्रिकेट संघाचे प्रशिक्षक फोटो: ठाणे वैभव
ठाणे: मुंबईचे माजी यष्टीरक्षक आणि ठाण्याचे रहिवासी सुलक्षण कुलकर्णी यांची ओमानच्या पुरुष राष्ट्रीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीलंकेचे दुलीप मेंडिस यांना १४ वर्षांनंतर मुख्य विकास अधिकारी म्हणून बढती मिळाली आहे. त्यामुळे रिक्त झालेल्या मुख्य प्रशिक्षकपदी सुलक्षण कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कुलकर्णी हे यापूर्वी ओमानचे उप-प्रशिक्षक होते. सुलक्षण कुलकर्णी हे एक माजी भारतीय प्रथम श्रेणी क्रिकेटपटू आणि यष्टिरक्षक-फलंदाज आहेत. सुलक्षण कुलकर्णी हे एक अनुभवी रणजी करंडक विजेते खेळाडू आणि प्रशिक्षक आहेत, ज्यांना दोन दशकांहून अधिक काळ प्रशिक्षकपदाचा अनुभव आहे. ५० षटकांच्या विश्वचषकासाठी ओमान संघाला मार्गदर्शन करण्याचे त्यांचे मुख्य ध्येय आहे. त्यांनी ओमान क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहण्यास सुरुवात केली आहे, असे ओमान क्रिकेटने फेसबुकवर कळविले आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600