जिल्हा

संत ज्ञानेश्वरनगर प्रभागात २५ वर्षे गढुळ पाण्याचा पुरवठा

संत ज्ञानेश्वरनगर प्रभागात २५ वर्षे गढुळ पाण्याचा पुरवठा
संत ज्ञानेश्वरनगर प्रभागात २५ वर्षे गढुळ पाण्याचा पुरवठा फोटो: ठाणे वैभव
रहिवाशांची महापालिका मुख्यालयावर धडक ठाणे: प्रभाग क्रमांक १३ संत ज्ञानेश्वर नगरमध्ये लुईसवाडी, वैतीवाडी, संत ज्ञानेश्वर नगर, रामचंद्र नगरसह आजूबाजूच्या परिसरात गेली २५ वर्षे गढूळ आणि दुर्गधीयुक्त पाणी येत असल्याचा आरोप करत संतप्त रहिवाशांनी शुक्रवारी ठाणे महापालिकेवर धडक दिली. गेल्या अनेक वर्षांपासून हाजुरी, लुईसवाडी आणि रामचंद्रनगर तसेच ज्ञानेश्वर नगर या परिसराला बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जलवाहिनेच्या माध्यमातून सुमारे २२.५० दश लक्ष पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. मात्र दर पावसाळ्यात येथील नागरिकांना अशुध्द पाणी पाजले जाते. या पाण्यामुळे लहान मुलांसह वयोवृद्ध नागरिकांना विविध विकार होत असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. पावसामुळे मातीमिश्रित पिवळसर पाणी ठाणेकरांना नाईलाजाने प्यावे लागत आहे. निवडणुका आल्या की नवीन जलवाहिन्या टाकण्याचे आश्वासन देण्यात येते. मात्र, परिस्थिती जैसे थे असल्याने स्थानिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. शिवसेना उबाठा गटाचे स्थानिक नगरसेवक शहाजी खूस्पे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी ठाणे पालिका मुख्यालयावर सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. यात अशुद्ध पाण्याच्या बाटल्या हातात घेऊन नागरीक सामील झाले होते. यावेळी संजय दळवी, प्रशांत पालांडे, तात्याराम झेंडे, मछिंद्र नागीमे, दिनेश औटी, अमोल हिंगे, अशोक जाधव, वैशाली घाटवळ, सुनिता जाधव, कविता भोसले आदी जण उपस्थित होते. संत ज्ञानेश्वर नगर व डॉ. गंगाधर नगर येथील काही भागात तानसा जलवाहिनी व समतानगर जलकुंभ या दोन ठिकाणाहून पाणी पुरवठा होत आहे. सध्या समतानगर जलकुंभात अपुरा पाणी पुरवठा म्हणजे ७ ते ८ एमएलडी पाणी येत असून तेथे १७ एमएलडी पाण्याची गरज आहे. समतानगर जलकुंभात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध झाल्यास वायरमेन वाडी पंचपरमेश्वर मंदिर परिसर, सोमेश्वर सोसायटी, अशोक मेडीकल परिसर, पाईपलाईन परिसर, शंकर मंदिर परिसर ते घरकुल सोसायटी पर्यंतच्या परिसरात पुरेसा पाणी पुरवठा होऊ शकतो असे यावेळी नगरसेवक शहाजी (गणेश) खूस्पे यांनी आयुक्तांना सांगितले. तानसा जलवाहिनीवरून रॉ वॉटर पुरवठा होत आहे. हे पाणी पिण्यायोग्य नसल्याने तानसा जलवाहिनीच्या शेजारी असलेल्या वैतरणा या शुध्द जलवाहिनीवर जोडणी दिल्यास डॉ. गंगाधर नगर, शिवसेना शाखा परिसर, बौध्द विहार परिसर, गगनगिरी सोसायटी, सिध्दगिरी सोसायटी व आजुबाजूच्या परिसरातील दुषित पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटेल असे यावेळी खूस्पे यांनी सांगितले. प्रक्रिया न केलेले पाणी या परिसरात सोडले जाते असे मोर्चेकरांनी आयुक्तांना सांगितल्यानंतर आयुक्त देखील चकित झाले. ही समस्या अत्यंत गंभीर असून तातडीने अंमलबजावणी करतो असे आश्वासन ठाणे पालिका आयुक्त सौरभ राव यांनी समस्त मोर्चेकरांना दिले.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600