महाराष्ट्र

श्रीरंग विद्यालयातील विद्यार्थ्यांचे सुयश

ठाणे: ठाण्यातील श्रीरंग विद्यालयाच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत मोठे यश मिळवले. मराठी माध्यम विभागात सृष्टी पाटील हिने ९६.८०टक्के गुण मिळवत शाळेत प्रथम क्रमांक पटकावला. निधी बोले हिने ९३.८० टक्के गुण मिळवून द्वितीय तर आर्या आंबुलकर हिने ८८.४० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला. इंग्रजी माध्यमात १७० पैकी १६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या विभागाचा एकूण ९७.०५ टक्के निकाल लागला. जसवंत सिंग आणि आरूष यादव यांनी ९६.२० टक्के गुण मिळवत या विभागात विभागून प्रथम क्रमांक पटकावला. ओमकार डोळस याने ९५.८० टक्के गुण मिळवून द्वितीय तर सोहम खानविलकर याने ९०.४० टक्के गुण मिळवत तिसरा क्रमांक पटकावला.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600