महाराष्ट्र

एमपीएससी परीक्षेत सोलापूरचा तन्मय राज्यात पहिला

एमपीएससी परीक्षेत सोलापूरचा तन्मय राज्यात पहिला
एमपीएससी परीक्षेत सोलापूरचा तन्मय राज्यात पहिला फोटो: ठाणे वैभव
६५१९ उमेदवारांची निवड मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२३ मधील लिपिक-टंकलेखक संवर्गाचा अंतिम निकाल आज अधिकृतपणे जाहीर करण्यात आला आहे. १७ डिसेंबर २०२३ रोजी मुंबईसह औरंगाबाद, अमरावती, नागपूर, नाशिक आणि पुणे या जिल्हा केंद्रांवर घेण्यात आलेल्या या परीक्षेतून एकूण ६५१९ उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. या परीक्षेच्या माध्यमातून एकूण २७८ नियुक्ती प्राधिकारी कार्यालयांमधील पदांसाठी ही शिफारस करण्यात आली आहे. आयोगाने या परीक्षेची अंतिम गुणवत्ता यादी आणि नियुक्ती प्राधिकरणनिहाय स्वतंत्र शिफारस याद्या आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या आहेत. या निकालात सोलापूर जिल्ह्याचे कटुळे तन्मय (AU053165) हे राज्यात प्रथम आले असून, सामान्य प्रवर्गातील सर्वोत्तम यश संपादन केले आहे. पुणे जिल्ह्यातील किसवे किशोर (PN068345) हे मागासवर्गीय प्रवर्गातून राज्यात प्रथम आले आहेत. महिला प्रवर्गामधून सांगली जिल्ह्यातील दुर्गा गावडे (PN071182) या राज्यात पहिल्या क्रमांकावर आहेत. यशस्वी उमेदवारांनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्याची शान उंचावली आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600