जिल्हा

तानसा काठोकाठ भरले; धामणीचे दरवाजे उघडणार

तानसा काठोकाठ भरले; धामणीचे दरवाजे उघडणार
तानसा काठोकाठ भरले; धामणीचे दरवाजे उघडणार फोटो: ठाणे वैभव
ठाणे: मुसळधार पावसामुळे शहापूर तालुक्यातील तानसा धरण काठोकाठ भरले असून त्याचे ११ दरवाजे उघडण्यात आले आहेत. पालघर जिल्ह्यातील धामणी धरण १०० टक्के भरण्याच्या मार्गावर आहे. लवकरच पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार असल्यामुळे सूर्या नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनामार्फत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यात जुलै महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. सूर्या प्रकल्पांतर्गत धामणी धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता २७६ दलघमी असून सध्या धरणामध्ये २०० दलघमी (७२ टक्के) पाणीसाठा तयार झाला आहे. धामणी धरणाची पूर्ण संचय पातळी ११८.६० मीटर असून बुधवारी सकाळी सात वाजता पाणी पातळी ११३ मीटरपर्यंत पोचली होती. सद्यस्थितीत चालू असलेल्या पावसामुळे गुरुवारपर्यंत धरणाची पाणी पातळी ११३.६० मीटरपर्यंत वाढणे अपेक्षित आहे. धरणात पाणी पातळी स्थिर ठेवण्यासाठी २३ जुलै रोजी धामणी धरणाचे तीन वक्राकार दरवाजे ४० सेमी उंचीत उघडणे योग्य राहणार असून सूर्या नदी पात्रात दोन हजार ८२० क्युसेक तर विद्युतगृहातून ६५० क्यूसेक असा एकूण ३४७० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्याने सूर्या नदीला पूर येण्याची शक्यता असून डहाणू आणि पालघर तालुक्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शहापूर तालुक्यातील तानसा तलाव बुधवारी सकाळी पावणेनऊ वाजता भरून वाहू लागला. त्यामुळे धरणाचे ११ दरवाजे उघडले आहेत. या तलावाची जलधारण क्षमता १४,५०८ कोटी इतकी आहे. तानसा धरण हे जगातील सर्वात लांबीच्या धरणांपैकी एक असून धरणाची लांबी २,७४३.२० मीटर आहे. या धरणातून दरदिवशी ४५५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. एकूण पाणीपुरवठ्याच्या ११ टक्के पाणी या धरणातून उचलले जाते. उर्ध्व वैतरणा ३९.०४ टक्के, मोडक सागर ६७ टक्के, तानसा ९७.९६ टक्के, मध्य वैतरणा ५३.०१ टक्के आणि भातसा धरण ५७.२७ टक्के भरले आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600