जिल्हा

टीम ओमी कलानी अंबरनाथमध्ये नगरपालिका निवडणूक रिंगणात

टीम ओमी कलानी अंबरनाथमध्ये नगरपालिका निवडणूक रिंगणात
टीम ओमी कलानी अंबरनाथमध्ये नगरपालिका निवडणूक रिंगणात फोटो: ठाणे वैभव
अंबरनाथ: उल्हासनगरमधील टीम ओमी कलानी पक्षाने अंबरनाथमध्ये निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला असून काही जागांची मागणी करण्यात आली आहे. शिवसेना शिंदें गटासोबत उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी तयार असलेल्या टीम ओमी कलानी पक्षाने अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीत काही उमेदवार उतरवण्याची घोषणा केली आहे. याबाबत टीम ओमी कलानी यांच्या पक्षाचे मुख्य प्रवक्ते मनोज लासी यांनी अंबरनाथ नगरपालिका सहायक निवडणूक निर्णय अधिकारी उमाकांत गायकवाड यांच्याकडे याबाबतचे आज गुरुवारी निवेदन दिले आहे. अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीत टीम ओमी कलानी पक्षाकडून उमेदवार देण्यात येणार असल्याचे पत्र दिले आहे. टीओकेच्या अंबरनाथमध्ये प्रवेशाने शहरातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. टीओकेने लोकसभा निवडणुकीत मैत्रीपूर्ण युतीद्वारे शिवसेनेचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासाठी काम केले होते. टीओकेचे नेतृत्व उल्हासनगरचे माजी आमदार पप्पू कलानी यांचे पुत्र ओमी कलानी करत आहेत.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600