जिल्हा

ठामपा दोन दिवसांत माला'माल'!

नवीन वर्षात सात कोटींचा मालमत्ता कर जमा ठाणे: ठाणे महापालिकेच्या मालमत्ता कर विभागावर लक्ष्मी प्रसन्न झाली असून पहिल्या दोन दिवसातच या विभागाने सुमारे सात कोटी रुपये घरपट्टी वसुल करण्याचा विक्रम केला आहे मागिल वर्षाच्या तुलनेत ही वसुली दुप्पट आहे. महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने एप्रिलच्या पहिल्याच दिवशी करदात्या नागरिकांना घरपट्टीची देयके पाठवल्यानंतर त्याला ठाणेकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. 1 एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत १८८७ नागरिकांनी पहिल्याच दिवशी एक कोटी ६७ लाख इतकी घरपट्टी भरली असून मागिल वर्षी ही वसुली दीड कोटी इतकी होती तर दुसऱ्या दिवशी म्हणजे २ एप्रिल रोजी महापालिकेच्या तिजोरीत संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पाच कोटी ६७ लाख इतकी घरपट्टी साडेतीन हजार करदात्या ठाणेकरांनी भरली होती. मागिल वर्षी तीन कोटी इतकी वसुली झाली होती. काल आणि आज मिळून सात कोटी इतकी रक्कम महापालिकेच्या तिजोरीत जमा झाली. ४७७५ करदात्यांनी ही रक्कम भरली होती. महापालिका हद्दीत सुमारे सहा लाख करदाते आहेत. त्यांना देयके वेळेवर दिली जात असून पहिले सहा महिने आधी घरपट्टी भरणाऱ्यांना महापालिका सामान्य करावर १० टक्के सूट देते. त्याचा लाभ ठाणेकरांना मिळत असतो, त्यामुळे घरपट्टी वेळेवर भरली जाते. ही घरपट्टी ऑनलाईन भरली गेली आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी मालमत्ता कर विभागाला यावर्षी ११०० कोटींचे उद्दिष्ट दिले असून त्याची सुरुवात चांगली झाली असल्याने या विभागातील अधिकारी-कर्मचारी उद्दिष्ट पूर्ण करतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. ठाणेकर करदाते हे प्रामाणिकपणे कर भरणा करतात. या वसुलीचे सर्व श्रेय हे ठाणेकर करदात्यांना असून महापालिका आयुक्त सौरभ राव आणि अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या मार्गदर्शनाखाली वसुलीची मोहीम सुरु करण्यात येणार असल्याची माहिती मालमत्ता कर विभागाचे उपायुक्त जी. जी गोदेपुरे यांनी दिली.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600