जिल्हा

'क' गटात ठामपाचा संघ अंतिम फेरीत

ठाणे: ठाणेवैभव करंडक वासंतिक आंतर कार्यालयीन क्रिकेट स्पर्धेच्या 'क' गटातील आज दादोजी कोंडदेव स्टेडियमवर झालेल्या अटीतटीच्या उपांत्य फेरीत ठाणे महानगरपालिका संघाने विहंग एन्टरप्रायझेसवर चार धावांनी मात करून अंतिम फेरीत प्रवेश केला. ठाणे पालिकेच्या आघाडीवीर विकी पाटीलने ८९ चेंडूत दोन चौकार आणि दोन षटकारांसह दमदार ६७ धावांनी खेळी करून पालिकेच्या डावास आकार दिला. त्याची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली. सेंचुरी रेयॉन वि. ठाणे महापालिका संघ अशी अंतिम लढत १८ मे रोजी होईल. संक्षिप्त धावफलक : 'क' गट (उपांत्य फेरी ठाणे महानगरपालिका ३७ षटकात ९ बाद १८१ (विकी पाटील ६७, प्रतीक प्रभू २३, अर्जुन शेट्टी१९, सय्यद मोहम्मद हाशीम ७-०-३६-३, कासीम आली ७-०-३०-३) विजयी वि. विहंग एन्टरप्रायझेज ३५ षटकात १७७ (राहुल कोंडावुर ४८, सुशांत कदम ४१, संतोष गोस्वामी २६, हर्षल सोनी ६२७-२, जयेश पाटील ७-०-३५-३, राकेश नाईक ५-०-२०-२)

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600