जिल्हा
सिल्व्हासातील रायफल शूटिंगमध्ये ठाण्याची विधी मणेरा अव्वल
सिल्व्हासातील रायफल शूटिंगमध्ये ठाण्याची विधी मणेरा अव्वल
फोटो: ठाणे वैभव
ठाणे: सिल्व्हासा येथे झालेल्या रायफल शूटींग स्पर्धेत ठाण्याच्या लेकीने तिहेरी सुवर्णभरारी घेतली असून, विधी किरण मणेरा हिने तीन गटांमध्ये सुवर्णपदक जिंकण्याची कामगिरी केली आहे. या कामगिरीबद्दल तिचे अभिनंदन करण्यात येत आहे.
दादरा व नगरहवेली आणि दमण-दिव शूटींग स्पोर्टस् असोसिएशनच्या वतीने सिल्व्हासा येथे दहावी राज्यस्तरीय शूटींग स्पर्धा झाली. या स्पर्धेत विधी मणेरा यांनी लक्षवेधी कामगिरी करीत मुली, तरुणी आणि महिलांच्या गटात प्रथम क्रमांक पटकावला. अशी कामगिरी करणारी विधी ही पहिलीच खेळाडू ठरली आहे. दहा मीटर रायफल शूटींग स्पर्धेत तिन्ही गटात वैयक्तिक खेळाडू म्हणून उतरलेल्या विधीने ३९२ गुणांची नोंद केली.
भाजपाच्या माजी नगरसेविका अर्चना मणेरा व समाजसेवक डॉ. किरण मणेरा यांची विधी ही कन्या आहे. ती गेल्या काही वर्षांपासून प्रशिक्षक योगेश गडामळे यांच्या मार्गदर्शनाखाली रायफल शूटींगचा सराव करीत असून, राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये तिने ठसा उमटविला आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600