जिल्हा

आरोपी आणि नातेवाईकांची कोर्ट आवारात पोलिसांशी हुज्जत

आरोपी आणि नातेवाईकांची कोर्ट आवारात पोलिसांशी हुज्जत
आरोपी आणि नातेवाईकांची कोर्ट आवारात पोलिसांशी हुज्जत फोटो: ठाणे वैभव
​उल्हासनगर: येथील चोपडा कोर्ट परिसरात २६ मे रोजी दुपारच्या सुमारास काही वेळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. न्यायालयात आणलेल्या काही आरोपींनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी पोलिसांशीच हुज्जत घालत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. या प्रकारामुळे कोर्ट आवारात एकच खळबळ उडाली होती. ​मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगर कॅम्प नंबर ३ येथील चोपडा कोर्टात काही आरोपींना सुनावणीसाठी आणण्यात आले होते. यावेळी आरोपी आणि त्यांच्या नातेवाईकांनी कैदी पार्टीसोबत असलेल्या पोलिसांशी वाद घालत आक्रमक भूमिका घेतली. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची चिन्हे दिसताच मध्यवर्ती पोलिस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणत संबंधितांना ताब्यात घेतले आणि प्रकरण शांत केले. या घटनेमुळे न्यायालय परिसरातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600