जिल्हा
परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे बजेट अवघे ५० कोटी
परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे बजेट अवघे ५० कोटी
फोटो: ठाणे वैभव
आर्थिक तरतुदींमध्ये ३०० कोटींपर्यंत वाढ करा - कॅप्टन दामले
अंबरनाथ: परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या वार्षिक आर्थिक तरतुदीत वाढ करावी, तसेच सामाजिक समस्या आणि प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांनी विशद केली.
विधान परिषदेच्या उपसभापती आमदार डॉ. निलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली परशुराम विकास महामंडळाचे अध्यक्ष आणि पदाधिकारी यांची आज मुंबईत बैठक झाली. भाजपचे ज्येष्ठ नेते माधव भंडारी, शेखर कुलकर्णी आदी वरिष्ठ नेते यावेळी उपस्थित होते. त्यावेळी समस्या आणि आर्थिक तरतुदींच्या मागण्यांवर चर्चा झाली.
महामंडळाची सध्याची वार्षिक आर्थिक तरतूद 50 कोटींची आहे. त्यात वाढ करून 300 कोटी रुपयांची तरतूद करावी, पुरोहित आणि पुजारी यांच्यासाठी कोर्स उपलब्ध करून त्यांना शासकीय प्रमाणपत्रे देण्याची व्यवस्था निर्माण करावी, कौशल्य विकास योजनेतून त्यांच्यासाठी राज्यभरात प्रशिक्षण वर्ग राबवावेत आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्यांवर लवकरात लवकर कार्यवाही करून हे प्रश्न सोडविण्याच्या अनुषंगाने सकारात्मक चर्चा यावेळी झाल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष दामले यांनी दिली.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600