जिल्हा
रोगापेक्षा इलाज भयंकर!
रोगापेक्षा इलाज भयंकर!
फोटो: ठाणे वैभव
* गायमुख घाट दुरुस्तीत नियोजनाचा अभाव
* वाहतुक कोंडीचा नाहक फटका
ठाणे: बुधवारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून गायमुख घाटात सिमेंट काँक्रीट टाकून खड्डे भरण्यात आले; मात्र खड्ड्यात भरलेले काँक्रीट घट्ट होण्याआधीच वाहतूकीला परवानगी दिल्याने कच्च्या काँक्रीटमध्ये वाहनांची चाके फसू लागली. त्यामुळे वाहतूक कोंडी वाढली.
बुधवारी घाटावरील खड्डे सिमेंट काँक्रीटने भरण्याचे काम केले आणि खड्ड्यात टाकलेले काँक्रीट घट्ट होण्याआधीच ते वाहतुकीला सुरू केले. त्यामुळे काँक्रीटने भरलेल्या खड्ड्यावरून वाहन घेऊन जाताच वाहनाचे चाक खड्ड्यात जागेवरच फिरू लागले. काही मिनिटातच घाटावर सर्वत्र सिमेंट काँक्रिट पसरल्याने घाटावर चढणाऱ्या गाड्या जागेवरच घसरून लागल्या. या विचित्र कामाच्या पद्धतीमुळे घाटावरील वाहतूक कोंडी दूर होण्याऐवजी आणखी वाढली. या कामाचा फटका वाहन चालकांना बसला. त्यामुळे रात्रीही हा घाट वाहतूक कोंडीत अडकला होता.
गायमुख घाट हा घोडबंदर मार्गावरील वाहतुकीचा महत्त्वाचा घटक आहे. मात्र दुरुस्तीच्या निकृष्ट कामांमुळे या घाटावर पुन्हा पुन्हा खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण होते. त्यामुळे येथे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा फटका ठाण्यासह पालघर, गुजरातला देखील बसतो. त्यामुळे या घाटाची वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुरुस्ती केली जाते. घाटाच्या रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवताना सार्वजनिक बांधकाम विभाग मोठ्या प्रमाणात हलगर्जीपणा करताना आढळते. सार्वजनिक बांधकाम विभागाचा हा हलगर्जीपणा पुन्हा एकदा आजच्या घटनेने समोर आला आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600