जिल्हा

राज्यातील महायुतीत सुरू असलेली धुसफूस दिल्लीत?

राज्यातील महायुतीत सुरू असलेली धुसफूस दिल्लीत?
राज्यातील महायुतीत सुरू असलेली धुसफूस दिल्लीत? फोटो: ठाणे वैभव
उपमुख्यमंत्री शिंदे यांची अमित शाह यांच्यासोबत चर्चा मुंबई: भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे. त्याचा सर्वात मोठा फटका हा भाजपचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाला देखील बसल्याचे पहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली असतानाच बुधवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीला जाऊन गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी भाजप नेत्यांची तक्रार केल्याचे बोलले जात आहे. मात्र श्री.शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना नाराजीचा कोणताही विषय दिल्लीत झाला नसल्याचे सांगितले. शिवसेना शिंदे गटातील अनेक पदाधिकाऱ्यांनी या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटात नाराजीचा सूर दिसून येत आहे. दरम्यान आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर होते, त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. सध्या राज्यात सुरू असलेल्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या भेटीदरम्यान एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांच्यामध्ये जवळपास 50 मिनिट चर्चा झाली आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्याकडे राज्यातील राजकीय घडामोडींचे कथन केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. विधानसभा निवडणुकीतल्या विजयानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये युतीसाठी अत्यंत पोषक वातावरण आहे, मात्र काही नेते ते वातावरण दुषित करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप यावेळी एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्याकडे केला असल्याचे बोलले जात आहे. विरोधकांना यामुळे आयतं कोलीत मिळतंय, मीडीयात नाहक उलटसुलट बातम्या येत आहेत. त्यामुळे जनमानसात उगाचच संभ्रम निर्माण होत आहे. कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे, युतीच्या विजयी घोडदौडीत त्यामुळे विनाकारण अडथळे निर्माण होण्याची शक्यता नाकारतां येत नाही. काही नेते वैयक्तिक स्वार्थापोटी काम करत आहेत, त्यांच्याकडून अशा पध्दतीने काम यापुढे होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. तसेच युतीतल्या नेत्यांनी एकमेकांवर टीका टाळली पाहिजे. भाष्य करताना प्रत्येकाने संयमाची आणि सामंजस्याची भूमिका घेणे अपेक्षित आहे, असं यावेळी एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांना सांगितल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील भाजपच्या वरिष्ठ नेत्याची तक्रार शिंदे यांनी शाह यांच्याकडे केल्याची माहिती मिळत आहे. या नेत्याकडून महायुतीमध्ये मिठाचा खडा पडत असल्याचा आरोप शिंदेंकडून करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. काय म्हणाले उपमुख्यमंत्री शिंदे? याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, शहा यांच्या भेटीत नाराजीचा कोणताही विषय नव्हता. स्थानिक पातळीवरील समस्या राष्ट्रीय पातळीवर न्यायच्या नसतात. मंत्रिमंडळाच्या बैठकीत महायुतीला बाधा पोहोचणार नाही अशी भूमिका किंवा विधाने टाळावीत असे ठरलेले आहे. बिहारमधील ऐतिहासिक विजयाबाबत अभिनंदन करण्यासाठी अमित शहा यांची भेट घेतल्याचे श्री.शिंदे यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600