जिल्हा

शिंदे गटातील पक्षांतराचे राज्यात तीव्र पडसाद

शिंदे गटातील पक्षांतराचे राज्यात तीव्र पडसाद
शिंदे गटातील पक्षांतराचे राज्यात तीव्र पडसाद फोटो: ठाणे वैभव
* कल्याण-डोंबिवलीचे शिंदे गटाचे तीन माजी नगरसेवक भाजपात * भाजपा विरोधात नाराजीनाट्य ठाणे: विविध पक्षातील माजी नगरसेवक आणि पदाधिकारी यांचा भाजपातील प्रवेश जोरात होत असताना आज मंगळवारी पुन्हा शिंदे यांच्या शिवसेनेतील कल्याण-डोंबिवली महापालिकेचे माजी नगरसेवक महेश पाटील, सुनीता पाटील, सायली विचारे आणि पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला. या वाढत्या प्रवेशामुळे शिंदे गटात भाजपविरोधात नाराजी पसरली असून त्याचे पडसाद राज्यात उमटले आहेत. ऐन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर महायुतीमध्ये भूकंप होण्याची शक्यता आहे. भाजपमध्ये आपल्या विरोधकांना प्रवेश दिला जात आहे, तसेच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनाही फोडलं जात असल्याचा आरोप शिंदे सेनेकडून केला जात आहे. त्यातच कल्याण-डोंबिवली महापालिकेतील माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर शिंदेसेनेचा तिळपापड झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या सर्वच मंत्र्यांनी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला. मंगळवारी कल्याण-डोंबिवली महापालिकेतील शिंदेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश पाटील, सुनीता पाटील आणि सायली विचारे यांनी भाजपात प्रवेश केला. याआधी हे तिन्ही नगरसेवक भाजपमध्येच होते, मात्र त्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला होता. आता त्यांची पुन्हा एकदा घरवापसी झाली. भाजपची सत्ता स्थापन झाल्यानंतर आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्याकडून प्रयत्न केल्यानंतर या तीनही माजी नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला. त्यामुळे हा शिंदेंच्या शिवसेनेसाठी धक्का समजला जात आहे. याचसोबत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपकडून सर्वच पक्षांतील नेत्यांची फोडाफोड सुरू असल्याचे दिसत आहे. त्यामधून शिंदेंची शिवसेनाही सुटली नाही. अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर भाजपने शिंदेंच्या सेनेचे संभाव्य उमेदवार, पदाधिकारी फोडले आणि त्यांना भाजपकडून तिकीट दिल्याचे बोलले जात आहे. राज्यात शंभूराज देसाई यांचे विरोधक सत्यजित पाटणकर, दादा भुसे यांचे विरोधक अद्वैय हिरे, किशोर पाटील यांचे विरोधक वैशाली सूर्यंवशी, सुहास बाबर यांचे विरोधक वैभव पाटील यांना भाजपात प्रवेश देण्यात आल्याने शिंदे गटातील मंत्र्यांची नाराजी वाढली आहे. सेनेचे नेते, नगरसेवक व पदाधिकारी यांना फोडून भाजपमध्ये घेतले जात आहे. ज्यांच्या विरोधात निवडणुका लढल्या त्याच उमेदवाराला भाजप आपल्या पक्षात घेत आहे. शिंदेच्या अनेक नेत्यांना किंवा पालकमंत्र्यांना विश्वासात न घेता अनेक निर्णय घेतले जातात किंवा निधी वळवला जातो. येऊ घातलेल्या निवडणुकीत युतीचा धर्म पाळला जात नाही. निधी मिळवण्यासाठीही शिंदेच्या मंत्र्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. संभाजी नगर, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, कोकण या ठिकाणी भाजपने असे प्रवेश करून घेतले आहेत किंवा युतीचा धर्म पाळला नाही, असा आरोप शिंदे गटाच्या मंत्र्यांनी करत नाराजी व्यक्त केली आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600