जिल्हा

वनक्षेत्रपालाने मागितली २० लाखांची लाच

१० लाख स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात पालघर: पालघर जिल्ह्यात अँटी करप्शन ब्युरोने 20 लाख रुपयांची लाच मागणाऱ्या मांडवी परीक्षेत्रातील वनक्षेत्रपाल संदीप चौरे याला अटक केली आहे. वनक्षेत्रपाल कर्मचाऱ्याने चक्क 20 लाख रुपयांची लाच मागितल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. वसई तालुक्यातील ससुनवघर येथील मालमत्तेवर ताबा मिळवून देण्यासाठी वनक्षेत्रपाल संदीप चौरे आणि खासगी इसम चंद्रकांत पाटील यांनी तक्रारदाराकडे लाच मागितली होती. तक्रारदाराने पालघर अँटी करप्शन ब्युरोकडे याबाबत तक्रार केल्यानंतर 19 नोव्हेंबर आणि 13 डिसेंबर रोजी त्याची पडताळणी करण्यात आली. आरोपींनी ठरलेल्या 20 लाखांपैकी 10 लाखांची रक्कम स्वीकृतीसाठी तयारी दाखवली होती. त्यानंतर, फिर्यादीच्या तक्रारीनुसार सापळा रचत एसीबीने खासगी इसम चंद्रकांत पाटील याला 10 लाख रुपयांची रोकड घेताना रंगेहात अटक केली. त्यानंतर, वनक्षेत्रपाल संदीप चौरे याचाही यात समावेश असल्याचने एबीपीच्या पथकाने संदीप चौरे यालाही अटक केली आहे. दरम्यान, तक्रारीनुसार आरोपींविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, एसीबी अधिकारी अधिकचा तपास करत आहेत.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600