जिल्हा
गृहरक्षक दलाचा जवानांनी रेल्वे प्रवाशाचा किमती ऐवज केला परत
गृहरक्षक दलाचा जवानांनी रेल्वे प्रवाशाचा किमती ऐवज केला परत
फोटो: ठाणे वैभव
कसारा: कल्याण लोहमार्ग पोलीस ठाणे अंतर्गत रात्रपाळीत कर्तव्यावर असलेल्या गृहरक्षक दलाच्या जवानांनी रेल्वे प्रवाशाचा किमती ऐवज परत केल्याने त्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक होत आहे.
कसारा तानाजी नगरात वास्तव्यास असलेले होमगार्ड सुशील ढवळे हे बुधवार 24 सप्टेंबर रोजी नेहमीप्रमाणे टिळकनगर येथून सुटणाऱ्या पुरी एक्सप्रेसमध्ये जीआरपी प्रविण भामरे यांच्या सोबत गस्त घालत होते. ठाणे स्थानक सोडल्यानंतर त्यांना एक बॅग संशयास्पद स्थितीत आढळून आली.
प्रसंगावधान राखून त्यांनी बॅगची तपासणी केली असता त्यामध्ये त्यांना एक ॲप्पल कंपनीचा ९० हजार रुपये किमतीचा मोबाईल, डेल कंपनीचा 75 हजार रुपये किमतीचा आणि लिनोव्हो कंपनीचा 65 हजार रुपये किमतीचा लॅपटॉप तसेच रोख रक्कम 800 रुपये, एक डायरी असा एकूण दोन लाख 30,800 रुपयांचा मुद्देमाल आढळून आला.
श्री. ढवळे यांनी वरिष्ठांच्या सल्ल्यानुसार डायरीतील दूरध्वनी क्रमांकावर तत्काळ संपर्क साधून पडताळणी केली असता, हा ऐवज विपुल गुप्ता (व्यवसाय-इंजिनिअरिंग) रा. ऐरोली यांचा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार संपूर्ण शहनिशा करून मुद्देमाल संबंधित इसमाच्या ताब्यात देण्यात आला.
या प्रकरणी होमगार्ड सुशील ढवळे- कल्याण पथक व जीआरपी प्रविण भामरे यांनी दाखविलेली तत्परता, दक्षता आणि प्रामाणिकपणाचे कौतुक होत आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600