जिल्हा

न्यायमूर्ती तपास अधिकाऱ्याच्या 'इन्व्हेस्टिगेशन'वर संतापले!

न्यायमूर्ती तपास अधिकाऱ्याच्या 'इन्व्हेस्टिगेशन'वर संतापले!
न्यायमूर्ती तपास अधिकाऱ्याच्या 'इन्व्हेस्टिगेशन'वर संतापले! फोटो: ठाणे वैभव
पाटोळे जामीन अर्ज सुनावणीत अधीक्षकांनाच हजर राहण्याचे आदेश ठाणे : ठाणे महापालिकेच्या लाचखोर उपायुक्तांच्या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या पोलिस निरीक्षकाला 'इन्वेस्टीगेशन' हा शब्द उच्चारता येत नसल्याने ठाण्याचे जिल्हा सत्र न्यायाधीश एस. एस.शिंदे यांनी चांगलेच धारेवर धरले. यावेळी त्यांनी लाच लुचपत विभागाच्या अधीक्षकांना उद्या न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले. ठामपा अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांच्या जमिन अर्जावर आज अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री. शिंदे यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यावर न्यायमूर्तींनी प्रश्नांची सरबत्ती केली होती. त्या अधिकाऱ्याला इन्वेस्टीगेशन या शब्दाचा उच्चार नीट करता आला नाही, त्यामुळे न्यायमूर्ती संतापले. आरोपीचा मोबाईल डाटा तपासला का? मोबाईलचा फॉरेन्सिक लॅबचा अहवाल आला का? त्यांच्या घराची झडती घेतली का? घरात काय सापडले? असे प्रश्न उपस्थित केले असता तपास अधिकाऱ्यांना उत्तरे व्यवस्थित देता आली नाहीत. त्यामुळे न्यायमूर्तींनी तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून उद्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षकांनाच न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश आरोपीच्या वकिलामार्फत दिले. अन्यथा लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्याच्या विरोधात कारवाई करण्यात येईल, असा इशारा न्यायमूर्तींनी दिल्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600