जिल्हा

पाच अल्पवयीन विद्यार्थिनींची छेडछाड

ठाणे: सावरकरनगर येथिल महापालिकेच्या पाच अल्पवयीन विद्यार्थिनींची छेडछाड करणाऱ्या रोड रोमिओविरोधात वर्तकनगर पोलिस ठाण्यात पालकांनी गुन्हा दाखल केला आहे. येथील महापालिकेच्या शाळेतील आठवी ते दहावी या वर्गात शिकणाऱ्या मुली सकाळी ७. १५ला शाळेत येत असताना शाळेपासून १५ ते २० मिटर अंतरावर एका ३० ते ३५ वयाच्या रोड रोमिओने या मुलींची छेडछाड केली होती. घाबरलेल्या तीन मुलींनी घरी जाऊन हा सर्व प्रकार सांगितल्यानंतर पालकांनी शाळेत धाव घेऊन वर्तकनगर पोलिस ठाणे गाठले. त्यानंतर आणखी दोन मुली त्यांच्या पालकांना घेऊन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी आल्या. वर्तकनगर पोलिस या भागातील सीसी टीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून आरोपीपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत. या विकृत नराधमाच्या विरोधात कडक कारवाई करावी, अशी मागणी पालकांनी आणि महापालिका शिक्षण मंडळातील अधिकाऱ्यांनी पोलिसांकडे केली आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600