जिल्हा
नाईक विरुद्ध शिंदे वाद उफाळला
गणेश नाईक यांच्या इशाऱ्यानंतर खासदार म्हस्के यांचे आव्हान
ठाणे: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नमोनिशाण मिटवण्याची भाषा करणाऱ्या वनमंत्री गणेश नाईक यांच्या विरोधात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली असून खा. नरेश म्हस्के यांनी त्यांच्याविरोधात तोफ डागली आहे.
वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री श्री.शिंदे यांचे ठाण्यातून नामोनिशाण मिटवण्याची भाषा केली होती. त्याला आज खा. नरेश म्हस्के यांनी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करून भाजपा प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी वनमंत्री श्री. नाईक यांना शिवसेनेचे नमोनिशाण मिटविण्याची परवानगी द्याच, मग आम्ही बघतोच असा इशारा खा. म्हस्के यांनी दिला आहे. राज्यातील महाविकास आघाडीची सत्ता उलथवून लावण्यात उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांचा सिंहाचा वाटा होता. ते लोकप्रिय होत आहेत, यामुळे श्री.नाईक यांचा पोटशूळ उठला आहे. नवी मुंबईमध्ये दहाही नगरसेवक निवडून येऊ शकत नाहीत, अशी वलग्ना करणाऱ्या नाईक यांच्या नाकावर टिच्चून शिवसेनेने ४२ जागा निवडून आणल्याचे खा. श्री नाईक यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
वारंवार महायुतीमध्ये विरजण टाकण्याचा प्रयत्न करणारे वनमंत्री श्री. नाईक पक्षाध्यक्ष आणि वरिष्ठ नेत्यांचे देखिल आदेश पाळत नसतील तर त्यांना परवानगी द्यावी मग आम्ही बघतोच, असा इशारा खा. श्री. म्हस्के यांनी दिला असून स्व. आनंद दिघे यांनी त्यांना कसा धोबीपछाड दिला होता, याची देखिल आठवण खा. श्री. म्हस्के यांनी यावेळी करून दिली आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600