जिल्हा
यात्रेला गेलेल्या तीन कल्याण-डोंबिवलीकरांचा अपघातात मृत्यू
यात्रेला गेलेल्या तीन कल्याण-डोंबिवलीकरांचा अपघातात मृत्यू
फोटो: ठाणे वैभव
डोंबिवली : पंढरपूर-मंगळवेढा रस्त्यावर शरद नगर येथे सोमवारी संध्याकाळच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात कल्याण-डोंबिवलीचे तीन भाविक ठार झाले आहेत. यात तीन महिलांचा आहे.
अपघातात सापडलेले बारा भाविक हे डोंबिवलीतून दोनच दिवसांपूर्वी सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूर यात्रेसाठी गेले होते. महालक्ष्मी देवी आणि तुळजा भवानी देवीचे दर्शन घेतल्यानंतर ते विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघाले होते. दरम्यान एका भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने गाडीला धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की गाडी ट्रकसह सुमारे 30 फूट फरफटत गेली आणि पूर्णपणे चिरडली गेली. काही प्रवासी रस्त्यावर पडले, तर काही जण गाडीत अडकले. या दुर्दैवी घटनेत कल्याण-डोंबिवलीच्या तीन भाविकांचा मृत्यू झाला आहे.
या भीषण अपघातात योगिनी केकाणे (डोंबिवली), सविता गुप्ता (डोंबिवली), सोनम अहिरे (कल्याण), आदित्य गुप्ता (परळ) या मृत असून जखमींमध्ये कविता तुडास्कर, सोनम गुप्ता, राजश्री कदम-सोनवणे, आरती गुप्ता, वेद गुप्ता, गणेश गुप्ता, रोहन केकाणे, अंजनी यादव आणि चालक नवनाथ हिडकिट्टी यांचा समावेश आहे. हा अपघात गाडी ओव्हरटेक करताना झाला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600