जिल्हा

जुने आले दोनशे रुपये पार!

नवीन आल्यास ९०चा भाव नवी मुंबई: काही महिन्यांपासून भाज्यांचे दर वधारले होते, ते आता आवाक्यात येत असून बाजारात सध्या आल्याचे बाजारभाव मात्र चढेच आहेत. जुन्या आल्याला अधिक मागणी असून आवक कमी असल्याने दर कडाडले आहेत. घाऊक बाजारामध्ये अवघे २०टक्के जुने आले दाखल होत असून उर्वरित नवीन आले आवक आहे. त्यामुळे घाऊकमध्ये जुने आले प्रतिकिलो २१० ते २२० रुपये तर नवीन आले ८५ ते ९० रुपयांनी विक्री होत आहे. सध्या पावसाळा सुरू झाला असून या थंडगार वातावरणात नागरिक आले घातलेला गरमागरम फक्कड चहा पिण्यास पसंती देत असतात. गृहिणींकडूनही प्रत्येक भाजीमध्ये आल्याला पसंती दिली जाते. त्यामुळे बाजारात गेल्यावर गृहिणी हमखास आले घेण्यास आखडता हात घेत नाहीत. बहुगुणी आले औषधीसाठीही वापरात असते, त्यामुळे वर्षाच्या ३६५ दिवस आल्यास मागणी असते. मागील तीन महिन्यांपासून आल्याची आवक घटली असल्याने दर वाढले आहेत, अशी माहिती व्यापारी संतोष नवले यांनी दिली आहे. यंदा पुरेसा पाऊस पडत नसल्याने उत्पादन कमी झाले असून परिणामी आवक घटली आहे. मंगळवारी घाऊक बाजारात १९ गाड्या दाखल झाल्या असून केवळ ७८३ क्विंटल आवक झाली आहे. यामध्ये ही जुन्या आल्याला अधिक मागणी असल्याने त्याचे दर चढेच आहेत. बाजारात ८० टक्के नवीन आले तर अवघे २०टक्के जुने आले दाखल होत आहे, त्यामुळे जुन्या आल्याला अधिक मागणी असून दर वधारलेलेच आहेत.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600