जिल्हा

पोलिस उपायुक्तांच्या अंगावर रिक्षा घालून रिक्षाचालक फरार

* पंकज शिरसाठ जखमी * रिक्षाचालकाला अटक

ठाणे : पोलिसांवरील हल्ल्याचे प्रमाण वाढत चालले असून काल दुपारी घोडबंदर मार्गांवर वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त पंकज शिरसाठ यांना रिक्षाने उडवून ठार मारण्याचा प्रयत्न झाला असून जबर जखमी झालेल्या उपायुक्तांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हेमंत वर्मा (२७) असे रिक्षा चालकाचे नाव आहे. तो वागळे भागातील साठे नगर येथे राहतो. काल दुपारी १ वाजता घोडबंदर मार्गावरील मानपाडा येथिल एम जी हेक्टर या गाडीचे शोरूम असलेल्या परिसरातील मार्गांवर पोलिस हवालदार नयन पांडव आणि पोलिस उपायुक्त पंकज शिरसाठ हे वाहतुकीचे नियमन करत होते. त्यावेळी ठाण्याकडून घोडबंदर मार्गांवर भरधाव वेगाने आलेल्या रिक्षाचालक हेमंत वर्मा याला पोलिसांनी थांबविण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला असता त्याने थेट पोलिस उपायुक्त पंकज शिरसाठ यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये श्री. शिरसाठ यांना जबर मार लागला. त्याकडे दुर्लक्ष करून रिक्षाचालक पळून गेला होता. पोलिसांनी उपायुक्त श्री.शिरसाठ यांना जखमी स्थितीत पोखरण येथिल बेथनी या खाजगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. या गुन्ह्यांची तक्रार हवालदार नयन पांडव यांनी चितळसर पोलिस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांनी रात्री उशिरा रिक्षाचालक हेमंत वर्मा याला अटक केली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक प्रशांत सांगळे हे करत आहेत.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600