ठाणे : शिळफाटा येथे हरित पट्ट्यावर अनधिकृतपणे बांधण्यात आलेल्या १७ अनधिकृत इमारतींच्या विरोधात कोर्ट रिसिव्हरच्या उपस्थितीत ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाईचा बडगा उगारल्याने अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
दोस्ती प्लॅनेटच्या पाठीमागे सुभद्रा टकले यांची सुमारे २२ हजार चौ मिटर इतकी जमिन आहे. ही जमिन हरित पट्ट्यामध्ये मोडते. या जमिनीवर काही जणांनी अनधिकृत १७ इमारती बांधल्या असून त्याविरोधात कारवाई करून भूखंड मोकळा करून द्यावा, या मागणीकरिता मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गिरीश कुळकर्णी आणि न्यायमूर्ती अरिफ डॉक्टर यांच्या खंडपिठाने या अनधिकृत इमारतींच्या विरोधात कारवाई करावी, असे आदेश दिले होते. काल या याचिकेवर आदेश देताना कोर्ट रिसिव्हर दिलीप तळेकर यांनी अनधिकृत इमारतींच्या विरोधात कारवाई करताना उपस्थित राहून त्याचा अहवाल न्यायालयाला सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार श्री. तळेकर यांच्या उपस्थितीत महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिक्रमण विभागाचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त शंकर पाटोळे, उपायुक्त मनिष जोशी यांनी जेसीबी, पोकलेन आणि मोठ्या पोलिस बंदोबस्तात कारवाई केली.
जिल्हा
दिव्यातील १७ अनधिकृत इमारतींवर दमदार कारवाई

ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600