जिल्हा

ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची मुदत ३१ मार्चला येणार संपुष्टात

निवडणूक कार्यक्रमाला उशीर का; शेतकऱ्यांचा संतप्त सवाल कल्याण : ठाणे जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक मुदत येत्या 31 मार्चला संपत आहे. अवघे २७ दिवस उरले असताना या बँकेचा निवडणूक कार्यक्रम अद्याप जाहीर न झाल्याने शेतकरी वर्गात संताप व्यक्त केला जात आहे. ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँक ठाणे पालघर जिल्ह्यातील अग्रगण्य बँक म्हणून गणली जात आहे. शेतकऱ्यांची बँक म्हणून राज्यात नावारूपास आलेली बँक आहे. या बँकेत शेतकरी, गृहनिर्माण संस्था, पतसंस्था, मच्छिमार सहकारी संस्था, शेतकरी सेवा सोसायटी, मजूर सहकारी संस्था यांच्या माध्यमातून प्रतिनिधी निवडून दिले जातात. 21 संचालक या बँकेच्या संचालक मंडळावर निवडले जातात. या संचालकांचा कार्यकाळ 30 मार्च 2026 रोजी संपत आहे. कार्यकाळ संपण्यासाठी अवघे २७ दिवस शिल्लक असताना निवडणूक कार्यक्रम जाहीर न झाल्याने शेतकरीवर्गात संभ्रम निर्माण झालेला आहे. सहकार विभागाने निवडणुकीबाबत नवीन नियमावली केलेली आहे. या नियमाचा फटका बसणार असल्याने विद्यमान संचालक मंडळातील 15 संचालकांना निवडणूक लढविण्यास प्रतिबंध होणार असल्याने अनेक वर्षे या बँकेत संचालक पदावर असणाऱ्या विद्यमान संचालकांना धक्का मानला जात आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600