जिल्हा
ठाण्यात तीन अप्पर पोलीस आयुक्तांच्या बदल्या
ठाण्यात तीन अप्पर पोलीस आयुक्तांच्या बदल्या
फोटो: ठाणे वैभव
ठाणे : ठाणे पोलिस आयुक्तालयामधील तीन अप्पर आयुक्तांच्या आज बदल्या करण्यात आल्या असून मागिल अनेक वर्षे ठाण्यात ठाण मांडून बसलेल्या पंजाबराव उगले यांचा यात समावेश आहे.
राज्य सरकारच्या गृह विभागाने राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. ठाणे गुन्हे विभागाचे अप्पर पोलिस आयुक्त पंजाबराव उगले यांची पोलिस गृह निर्माण मंडळाच्या विशेष पोलिस महानिरीक्षक पदी बदली करण्यात आली आहे, प्रशासन विभागाचे अप्पर पोलिस आयुक्त एस. व्ही. पाठक यांची पुणे येथिल आर्थिक गुन्हे विभागाच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे तर ठाण्याचे अपर पोलिस आयुक्त विनायक देशमुख यांची वैधमापन विभागाच्या नियंत्रकपदी बदली करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त श्री. गोरे यांना ठाणे पोलिस आयुक्तालयात एक वर्ष मुदतवाढ देण्यात आली आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600