जिल्हा

२० फूट खोल चेंबरमध्ये पडून दोन वर्षांचा मुलगा जखमी

२० फूट खोल चेंबरमध्ये पडून दोन वर्षांचा मुलगा जखमी
२० फूट खोल चेंबरमध्ये पडून दोन वर्षांचा मुलगा जखमी फोटो: ठाणे वैभव
स्थानिकांच्या प्रसंगावधानामुळे बालक बचावला ठाणे: अर्ध उघड्या २० फूट खोल चेंबरमध्ये एक दोन वर्षांचा मुलगा पडल्याची घटना मंगळवारी रात्री उघडकीस आली आहे. ही घटना धर्मवीरनगर येथे घडली. जखमी मुलावर ज्युपिटर रुग्णालयात उपचार ठाणे येथील राबोडी भागात हमदान कुरेशी (२) हा राहतो. त्याचे नातेवाईक मेंटल हॉस्पिटलजवळ राहतात. तो १८ नोव्हेंबर रोजी रात्री त्याच्या आईसोबत नातेवाईकांकडे जात होता. ज्ञानसाधना कॉलेजसमोरील धर्मवीर नगर येथील फुटपाथवरून जात असताना तोल जाऊन तो बाजूच्या स्ट्रॉम वॉटर पाईपलाईनकरिता असलेल्या गटार चेंबरमध्ये पडला. हे चेंबर अंदाजे २० फूट खोल होते. या प्रकाराने त्याची आई भेदरली, तिने मदतीसाठी आरडाओरडा केला. स्थानिक नागरिक मदतीसाठी धावले. त्यानंतर काही नागरिकांनी मुख्य अग्निशमन नियंत्रण कक्षास माहिती दिली. माहिती मिळताच ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासीन तडवी, नौपाडा-कोपरी प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त जामनोर, माजी नगरसेवक विकास रेपाळे, नम्रता भोसले, उप नगर अभियंता सुधीर गायकवाड, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे पथक, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान तसेच बांधकाम विभागाचे व पाणी पुरवठा विभागाचे अभियंता घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, पथके येईपर्यंत चेंबरमध्ये पडलेल्या मुलाला तेथील स्थानिकांनी बाहेर काढले. त्याला दुखापत झाली असल्याने उपचाराकरिता प्रथम जिल्हा शासकीय रुग्णालय आणि नंतर ज्युपिटर हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. या मुलाला नेमकी किती दुखापत झाली आहे याविषयी अद्याप समजू शकलेले नाही उघडे ठेवण्यात आलेल्या चेंबरचे झाकण लोखंडी पाईपमुळे बंद होत नव्हते. यामुळे आपत्ती व्यवस्थापन पथकाने सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हा पाईप ग्रँडर आणि गॅस कटरच्या सहाय्याने कापून बाजूला करण्यात आला असून चेंबर बंद केला.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600