जिल्हा
राष्ट्रीय ग्रेपलिंग कुस्ती स्पर्धेत यश ढाकणेची सुवर्ण कामगिरी
राष्ट्रीय ग्रेपलिंग कुस्ती स्पर्धेत यश ढाकणेची सुवर्ण कामगिरी
फोटो: ठाणे वैभव
कल्याण : कल्याण आडीवली येथील रहिवासी श्याम ढाकणे यांचा मुलगा यश ढाकणे याने नुकत्याच देहराडून, उत्तराखंड येथे पार पडलेल्या राष्ट्रीय ग्रेपलिंग कुस्ती स्पर्धेत 66 किलो वजनी गटात सुवर्ण पदकाची कमाई केली असून यश याची जागतिक स्पर्धेसाठी भारत देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली आहे. त्याने मिळविलेल्या यशाबद्दल त्याचे विविध सामाजिक माध्यमातून कौतुक केले जात आहे.
यशचे वडील श्याम ढाकणे हे मूळचे मौजे धुळवड, ता. सिन्नर, जि. नाशिक येथील डोंगराळ वस्तीतून प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ठाणे शहर पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबल म्हणून नोकरी करीत आहेत. यश याने कुस्तीचे धडे वस्ताद प्रज्वलदीप ढोणे यांच्या मार्गदर्शनाखाली जय बजरंग कुस्ती आखाडा, नांदिवली, कल्याण पूर्व येथून गिरविण्यास सन २०२१-२२ साली सुरवात केली. सध्या तो सेना केसरी पै. गुंडाजी पाटील, कोल्हापूर यांच्याकडे कुस्तीचा सराव करीत आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600